SBI Bank  Dainik Gomantak
अर्थविश्व

SBI खातेदारांचे बल्ले-बल्ले, तुम्हालाही मुलगी असेल तर बॅंक देणार 15 लाख रुपये!

SBI: या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि तिच्या लग्नासाठी बँकेकडून 15 लाख रुपये दिले जातात.

Manish Jadhav

State Bank Of India: केंद्रातील मोदी सरकारने (Modi Govt) मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि तिच्या लग्नासाठी बँकेकडून 15 लाख रुपये दिले जातात.

या प्रकारच्या गुंतवणुकीमुळे तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्येचा सामना करावा लागणार नाही. या योजनेत गुंतवणूक केल्याने, तुम्हाला उच्च शिक्षणाच्या वेळी किंवा लग्नासाठी मोठा निधी मिळेल.

तुम्ही 1.5 लाखांपर्यंत गुंतवणूक करु शकता

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सह इतर बँका ग्राहकांना सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्याची सुविधा देत आहेत. तुम्हाला सुकन्या समृद्धी खात्यात वार्षिक फक्त 250 रुपये गुंतवावे लागतील.

यामध्ये, तुम्ही दरवर्षी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक (Investment) करु शकता. हे पैसे तुम्ही मासिक हप्त्यांमध्येही जमा करु शकता. परंतु काही कारणास्तव तुमच्याकडे आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपये नसल्यास, तुम्ही 250 रुपये जमा करुन खाते सुरु ठेवू शकता.

80C अंतर्गत कर सूट

याबाबतची, माहिती एसबीआयने ट्विट करुन दिली आहे. या सरकारी योजनेत तुम्हाला खात्रीशीर उत्पन्न मिळत राहील. यामध्ये गुंतवणूक केल्याने, तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभही मिळेल. विशेषतः मुलींसाठी (Girls) ही योजना सुरु करण्यात आली आहे. मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी शासनाने ही योजना सुरु केली.

सध्या, सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के दराने व्याज मिळत आहे. याशिवाय, या योजनेअंतर्गत तुम्ही दोन मुलींसाठी खाते उघडू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT