Business Idea in Winter Dainik Gomantak
अर्थविश्व

Business Idea in Winter: हिवाळ्यात सुरू करा ड्राय-फ्रुटचा बिझनेस; इम्यूनिटीसह वाढवा इनकम

तुम्हीही या हिवाळ्यात कोणता तरी बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एक उत्तम बिझनेस आयडिया देणार आहोत.

दैनिक गोमन्तक

तुम्हीही या हिवाळ्यात काहीतरी सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत. हा व्यवसाय सुरू करून तुम्ही चांगली कमाई करु शकता. तुम्हाला या व्यवसायात जास्त गुंतवणुकीची गरज नाही. तुम्ही तो कमी पैशात सुरू करू शकता. चला तर मग जाणून घेउया हा बिझनेस कोणता आहे.

हिवाळ्यात (Winter) लोक शरीराला उबदार ठेवण्यासाठी सुक्या मेव्याचे सेवन मोठ्या प्रमाणात करतात. कारण सुका मेवा आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यास खूप मदत करतो. बदाम, अक्रोड, मनुके, काजू यांसारखी ड्राय फ्रुट्स (Dry Fruits) थंडीच्या वातावरणात आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर असतात. हा बिझनेस सुरू करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

  • सुरुवात कशी करावी?


जर तुम्ही ड्राय फ्रुटसचा बिझनेस केलात तर तुम्हाला खूप चांगला नफा मिळू शकतो. हा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्ही कोणत्याही मोठ्या बाजारातून स्वस्त दरात ड्रायफ्रूट्स खरेदी करू शकता आणि तुमच्या परिसरात किंवा मार्केटमध्ये किरकोळ दराने विकून चांगला नफा मिळवू शकता. सुका मेवा मोठ्या बाजारातून स्वस्त दरात विकत घेणे आणि आपल्या परिसरात किंवा बाजारात किरकोळ दराने विकणे याला ड्राय फ्रुटसचा घाऊक बिझनेस म्हणतात.

  • जास्त खर्चाची गरज नाही
    सुक्या मेव्याचा बिझनेस सुरु करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे गुंतवण्याची गरज नाही. तुम्ही हळूहळू व्यवसाय वाढवू शकता.

  • कोणत्याही व्यवसायासाठी ठिकाण आणि स्थान महत्त्वाचे असते. त्याचे स्थान खूप महत्त्वाचे असते. सुक्या मेव्याचा बीझनेस सुरू करायचा असेल तर भाड्याने दुकान घ्यावे लागेल. यासोबतच तुम्हाला गोडाऊनचीही गरज भासू शकते. तुमचे घर अशा ठिकाणी असेल जिथे लोकांची ये-जा असते, गर्दी असते, तर तुम्ही घरीही ड्रायफ्रुट्सचा बीझनेस सुरू करू शकता.

  • या व्यवसायात कमाईबद्दल बोलायचे झाले तर ड्राय फ्रुटच्या घाऊक व्यवसायात 20 ते 30 टक्के नफा मिळतो. नफ्याच्या दृष्टीकोनातून बघितले तर तो खूप चांगला नफा आहे. या व्यवसायात सुरुवातीला थोडी कमी कमाई होते. परंतु जसजसा बीझनेस वाढू लागतो तसतसे या बीझनेसमध्ये तुम्हाला चांगला नफा मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

CJP Protest: "शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार!" विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पोलिसांना नडला; दडपशाही रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT