spicejetने केली 14 नवीन देशांतर्गत उड्डाणे सुरू  Dainik Gomantak
अर्थविश्व

SpiceJet ची या शहरांसाठी थेट उड्डाणे उपलब्ध असतील

SpiceJet ने 14 नवे उड्डाण चालवण्यासाठी एयरलाइन आपल्या Q400 विमानाचा वापर केला जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

हवाई प्रवाशासाठी दिलासादायक बातमी आहे. एअरलाईन कंपनी (Airline company) स्पाइसजेटने (SpiceJet) शुक्रवारी ग्वालियर आणि भावनगरसारख्या नवीन देशांतर्गत (Domestic Flights ) अनेक शहरांना जोडणारी 14 नवीन देशांतर्गत उड्डाणे सुरू केली आहे. अशी माहिती एका निवेदनात दिली आहे. हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia)यांनी भावनगर-दिल्ली मार्गावरील 14 उड्डाणांपैकी एक उड्डाण सेवा सुरू केली आहे. अलीकडेच इंडिगोने (Indigo) मध्य प्रदेशमधील ग्वालियर आणि दिल्ली (दिल्ली- ग्वालियर आणि इंदोर ग्वालियर) या मार्गाना जोडणारी दैनंदीन उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे.

SpiceJetने काय म्हटले?

स्पाइसजेटची प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि लहान शहरांना देशाच्या विमानन नकाशावर आणण्याच्या आमच्या वचनबाद्धतेचा भाग म्हणून 14 नवीन उड्डाणे सुरू करणार आहे, असे स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी एका निवेदनात मसांगितले आहे. त्यापैकी पहिले उड्डाण म्हणजे भावनगर-दिल्ली , भावनगर-सूरत, ग्वालियर -जयपूर, किशनगड(अजमेर)- मुंबई, पुणे- तिरूपती आणि वाराणसी- देहरादुन असणार आहेत. ते म्हणाले , आम्ही भावनगरलाही मुंबईशी जोडू. भावनगर हे गुजरातमधील सहावे मोठे शहर आहे जिथे स्पाइसजेट उड्डाण सेवा सुरू होणार. हे 14 नवे उड्डाण चालवण्यासाठी एयरलाइन आपल्या Q400 विमानाचा वापर केला जाणार आहे.

मध्य प्रदेश आणि दिल्ली

एअरलाइन्स इंडिगो 1 सप्टेंबरपासून मध्य प्रदेश आणि दिल्लीला जोडणारी दैनंदिन उड्डाणे सुरू करणार आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 13 ऑगस्ट रोजी केलेल्या ट्विटमध्ये म्हणटले आहे की, इंडिगो एअरलाइन्स 1 सप्टेंबरपासून नियमितपणे दिल्ली-ग्वालियर आणि इंदोर- ग्वालियर दरम्यान नवीन उड्डाण मार्ग सुरू करणार आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT