Nirmala Sitaraman  Dainik Gomantak
अर्थविश्व

Small Savings Scheme Interest Rates: पीपीएफ-सुकन्या समृद्धी योजनेसंबंधी सरकार लवकरच देणार खूशखबर; अर्थमंत्री करणार घोषणा!

SSY Interest Rates: आरबीआयने ऑगस्टमध्ये होणाऱ्या एमपीसीमध्ये व्याजदरात वाढ केली नाही. आरडी किंवा एफडीवर बँकांकडून दिले जाणारे व्याज सर्वाधिक आहेत.

Manish Jadhav

PPF Interest Rates: तुम्ही पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट किंवा किसान विकास पत्र इत्यादीसारख्या सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या छोट्या बचत योजनांमध्येही गुंतवणूक करत असाल तर ही बातमी वाचल्यानंतर तुम्हीही आनंदी व्हाल.

होय, सरकार 29 आणि 30 सप्टेंबर रोजी तुम्हाला आनंदाची बातमी देऊ शकते. वाढत्या महागाईला आटोक्यात आणण्यासाठी, आरबीआयने ऑगस्टमध्ये झालेल्या बैठकीत व्याजदरात वाढ केली नाही. आरडी किंवा एफडीवर बँकांकडून दिले जाणारे व्याज सर्वाधिक आहे.

व्याजदरात वाढ होण्याची अपेक्षा

अशा परिस्थितीत या महिन्याच्या अखेरीस छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे.

अल्पबचत योजनेवर देण्यात येणाऱ्या व्याजदराचा वित्त मंत्रालयाकडून दर तिमाहीत आढावा घेतला जातो. जूननंतर आता हा आढावा सप्टेंबरअखेर होणार आहे.

तत्पूर्वी, 30 जून रोजी झालेल्या आढावा बैठकीत काही अल्पबचत योजनेच्या (एसएसवाय) व्याजदरातही (Interest Rate) वाढ करण्यात आली होती. यापूर्वी एप्रिल-जून 2023 या कालावधीसाठीही दर वाढवण्यात आले होते.

आरडीचे व्याजदरही वाढले

दरम्यान, 30 जून रोजी केलेल्या बदलामध्ये, सरकारने एक वर्ष आणि दोन वर्षांच्या पोस्ट ऑफिस एफडीचे दर अनुक्रमे 10 बेस पॉइंट्स (BPS) ने वाढवून 6.9% आणि 7.0% केले.

याशिवाय, पोस्ट ऑफिसच्या (Post Office) 5 वर्षांच्या आवर्ती ठेवीच्या व्याजदरात 30 bps ने वाढ करण्यात आली आहे. यानंतर, आरडीवरील व्याजदर 6.5% पर्यंत वाढला. याशिवाय इतर योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

तसेच, 2020-21 च्या दुसऱ्या तिमाहीपासून 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत लघु बचत योजनेचा व्याजदर सलग 9 महिने समान पातळीवर राहिला. आता गेल्या काही दिवसांपासून सरकारकडून बदल करण्यात येत आहेत. मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, यावेळी सरकारकडून पीपीएफच्या व्याजदरात वाढ होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT