Small Savings Schemes: सुकन्या समृद्धी-पीपीएफचे सरकारने बदलले नियम, अर्थमंत्र्यांचा आदेश जारी

FM Nirmala Sitaraman: आता या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांकडे पॅन आणि आधारकार्ड असणे आवश्यक आहे. हा बदल 1 एप्रिल 2023 पासून लागू झाला आहे.
Nirmala Sitaraman
Nirmala SitaramanDainik Gomantak
Published on
Updated on

PPF-SSY Rule Change: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), सुकन्या समृद्धी योजना (SSY), महिला सन्मान योजना आणि पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सरकारने नियम बदलले आहेत.

आता या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांकडे पॅन आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. हा बदल 1 एप्रिल 2023 पासून लागू झाला आहे. तुम्हीही या सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल आणि तुमच्याकडे पॅन किंवा आधार कार्ड नसेल, तर तुम्ही ते लवकरात लवकर बनवा.

पारदर्शकतेसाठी नियम बदलले

तुम्ही असे न केल्यास, तुम्हाला या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी दिली जाणार नाही. या योजनांमधील गुंतवणूक अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने सरकारने हा बदल केला आहे. या योजनांमधील गुंतवणूकदारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठीही हा बदल करण्यात आला आहे.

अलीकडेच, अर्थ मंत्रालयाने एक नोटीस जारी करुन म्हटले आहे की, सरकारने (Government) जारी केलेल्या लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधार आणि पॅन अनिवार्य असेल. यापूर्वी, आधार क्रमांक नसतानाही या योजनांमध्ये गुंतवणूक करता येत होती.

Nirmala Sitaraman
Small Savings Interest Rates Increased: मोठी बातमी! सरकारने व्याजदरात केली भरघोस वाढ, आता PPF-SSY वर मिळणार इतका लाभ

गुंतवणूक करण्यासाठी पॅनकार्ड दाखवणे आवश्यक

नोटीसमध्ये म्हटले आहे की, गुंतवणूकदारांना (Investors) कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आधार क्रमांक सादर करावा लागेल. तसेच मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यासाठी पॅनकार्ड दाखवावे लागेल.

सरकारी योजनांमधील गुंतवणूक अधिक पारदर्शक आणि सुलभ व्हावी यासाठी हा बदल करण्यात आला आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला खाते उघडल्यानंतर सहा महिन्यांच्या आत आधार क्रमांक सादर करावा लागेल.

जर तुम्ही ठराविक मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला पॅनकार्डही जमा करावे लागेल.

Nirmala Sitaraman
PPF Saving Scheme: सरकारी आदेश! पीपीएफ खातेदारांना करावे लागेल 'हे' काम, अन्यथा...

लहान बचत योजनांमध्ये खाते उघडण्यासाठी तुम्हाला या कागदपत्रांची आवश्यकता असेल-

- पासपोर्ट आकाराचा फोटो

-आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी स्लिप

- पॅन क्रमांक, जर विद्यमान गुंतवणूकदारांनी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पॅनकार्ड आणि आधार कार्ड (Aadhar Card) सादर केले नाही तर त्यांचे खाते 1 ऑक्टोबर 2023 पासून बंद केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com