Gold Dainik Gomantak
अर्थविश्व

Gold And Silver Price: सोन्या-चांदीच्या दराला मोठा ब्रेकडाऊन! 'एवढ्या' हजारांनी स्वस्त झाली चांदी, सोन्याच्याही दरात घसरण; ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी

Gold And Silver Price: भारत आणि जगभरातील सराफा बाजारात सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) किमतीत सध्या सातत्याने मोठी घसरण होताना दिसत आहे.

Manish Jadhav

Gold And Silver Price: भारत आणि जगभरातील सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत सध्या सातत्याने घसरण होताना दिसत आहे. मौल्यवान धातूंच्या किमतीतील या सततच्या घसरणीमुळे आगामी फेस्टिव्ह सीझनसाठी दागिने आणि वस्तू खरेदी करणाऱ्या सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर, दुसरीकडे उच्च दराने सोने-चांदी खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांची चिंता वाढू लागली आहे.

जागतिक स्तरावर मिळणाऱ्या कमकुवत संकेतांमुळे मौल्यवान धातूंच्या किमती खाली येत आहेत. विशेषतः अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या (US Federal Reserve) काही अधिकाऱ्यांनी पुढील महिन्यात व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत दिले आहेत. याचा परिणाम म्हणून अस्थिरतेच्या काळात सोन्यातील सुरक्षित गुंतवणूक (Safe Haven Investment) करण्याची गुंतवणूकदारांची मागणी कमी झाली आहे.

विक्रमी उच्चांकावरुन मोठी पडझड

त्याचवेळी, यावर्षात सोने आणि चांदीने विक्रमी उच्चांक गाठला, परंतु त्यानंतर किमतीत मोठी पडझड झाली. दिल्लीतील सराफा बाजारात 17 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,34,800 प्रति 10 ग्रॅम या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. तर चांदीने 14 ऑक्टोबर रोजी 1,85,000 प्रति किलो या सर्वकालीन उच्चांकी दराला स्पर्श केला. या उच्चांकानंतर दोन्ही धातूंच्या किमतीत सातत्याने घसरण सुरु झाली.

4 नोव्हेंबरची स्थिती: किमतीत मोठी घट

मंगळवार, 4 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील सराफा बाजारात पुन्हा एकदा मोठी घसरण नोंदवली गेली. कमकुवत जागतिक संकेतांमुळे ही घसरण झाली. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,200 ची मोठी घट झाली आणि तो 1,24,100 प्रति 10 ग्रॅम वर पोहोचला. तर चांदीच्या दरात तर 2,500 ची मोठी घसरण झाली आणि ती 1,51,500 प्रति किलोग्रॅम या स्तरावर स्थिरावली.

सोने आणि चांदी किती स्वस्त झाले?

वर्तमान दरांची तुलना त्यांच्या विक्रमी उच्चांकाशी केल्यास, किमतीतील फरक स्पष्टपणे दिसून येतो. सोन्याचा भाव त्याच्या विक्रमी उच्चांकावरुन आता 10,700 ने (प्रति 10 ग्रॅम) स्वस्त झाला. त्याचवेळी, चांदीचा भाव त्याच्या विक्रमी उच्चांकावरुन तब्बल 33,500 ने (प्रति किलो) स्वस्त झाला.

सोन्या-चांदीच्या दरात घसरण होण्याची प्रमुख कारणे

मौलावन धातूंच्या दरात इतकी जलद घसरण होण्यामागे अनेक प्रमुख आर्थिक कारणे आहेत.

अमेरिकी डॉलरची मजबूती: डॉलर (US Dollar) मजबूत झाल्यामुळे आणि जागतिक पातळीवरील आर्थिक अनिश्चितता कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांची सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी घटली आहे.

व्याजदर कपातीची सीमित अपेक्षा: तसेच, अमेरिकेत व्याजदर कपात होण्याची शक्यता कमी आहे. व्याजदर स्थिर राहिल्यास किंवा वाढल्यास, सोन्यासारख्या बिगर-व्याज देणाऱ्या मालमत्तेची (Non-interest bearing assets) मागणी कमी होते आणि दरात घसरण होते.

जागतिक तणावात घट: अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार करारावर सकारात्मक चर्चा होण्याची आशा आणि भू-राजकीय तणावात झालेली घट यामुळे सुरक्षित गुंतवणुकीची मागणी कमी झाली आहे.

नफा बुकिंग (Profit Booking): किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीची विक्री केली. यामुळे बाजारात विक्रीचा दबाव वाढला आणि किमती वेगाने खाली आल्या.

एकंदरीत, सोन्या-चांदीच्या दरातील ही घसरण खरेदीदारांसाठी एक मोठी संधी घेऊन आली आहे. मात्र, जागतिक बाजारातील अस्थिरता पाहता, सोने-चांदीच्या किमतीत पुन्हा काही दिवसांत वाढ किंवा घट होण्याची शक्यता कायम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गोवा सरकारचा मोठा निर्णय; चार कनिष्ठ अधिकाऱ्यांची सेवा केली समाप्त!

Hong Kong Fire Video: हाँगकाँगमध्ये भीषण आग! 65 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

SCROLL FOR NEXT