share market, 
अर्थविश्व

अदाणींच्या कंपनीचे शेअर 20 टक्क्यांनी वधारले; 7 दिवसात गुंतवणूकदार मालामाल

गोमंन्तक वृत्तसेवा

नवी दिल्ली: आठवड्याच्या पहिल्या दिवशी अदानी पॉवर शेअरकडे गुंतवणूकदारांची क्रेझ इतकी वाढली की त्याला अपर सर्किट मिळाले. 20% च्या वाढीसह, शेअरने आज 126.90 रुपयांच्या पातळीवर एक सर्किट सुरू केले आहे. हे सर्किट ऑल टाइम उच्च पातळी आहे. तसे, गेल्या सहा सत्रांमध्ये, त्यांच्या शेअर्समध्ये स्थिर वाढ दिसून येत आहे. त्याआधी हा शेअर सलग पाच सत्रात खाली येवून बंद झाला होता.

अदानी पॉवरच्या शेअर वाढीचा वेग 31 मेपासून सुरू झाला. त्या दिवशी त्यातील शेअरमध्ये 0.60 टक्क्यांची वाढ दिसून आली आणि हे शेअर 92.50 रुपयांवर बंद झाले. गेल्या सहा व्यापार सत्रात ही वाढ 38 टक्क्यांपर्यंत गेली आहे. या शेअर्स बद्दल बोलायचे झाले तर गेल्या एका महिन्यात सुमारे 31 टक्के, तीन महिन्यांत 70 टक्के आणि एका वर्षात 226 टक्के रिटर्न दिला आहे. या स्टॉकने 3 वर्षात 557 टक्के चांगला रिटर्न दिला आहे.

RBIचा मोठा निर्णय; आता सुट्टीच्या दिवशीही खात्यात होणार पगार जमा!

मार्च तिमाहीत कंपनीची कामगिरी उत्कृष्ट होती

मार्च तिमाहीत कंपनीची कामगिरी उत्कृष्ट होतांना दिसत आहे. कंपनीचा निव्वळ नफा 13.13 कोटी होता तर मार्च 2020 मध्ये कंपनीला 1312 कोटींचा तोटा झाला होता. मार्च 2020 च्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 6902 कोटी रुपयांवरून 6327 कोटींवर गेले आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 1270 कोटी होता, तर आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये कंपनीला 2274 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. सन 2020-21 मध्ये कंपनीचे एकूण उत्पन्न 28149कोटी होते, जे 2020-21 मध्ये 27841 कोटी होते.

आरबीआयने जीडीपी वाढीचा दर घटविला, रेपो रेट मात्र जेसे थे

अदानी जगातील 14 वे श्रीमंत माणूस
सन 2021 मध्ये अदानी ग्रुप ऑफ कंपनीने शानदार कामगिरी बजावली, यामुळे गौतम अदानीची संपत्ती प्रचंड वाढली आहे. मबर्ग बिलिनेयर इंडेक्सनुसार सध्या ते जगातील 14व्या  क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहे आणि त्यांची संपत्ती 77.7 अब्ज डॉलर्स आहे. यावर्षी त्याची संपत्ती 43.90 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. तसेच मालमत्ता वाढीच्या बाबतीत ते दुसर्‍या क्रमांकावर आहे. दरम्यान बर्नार्ड अर्नाल्ट पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्यांची संपत्ती 57.90 अब्ज डॉलर्सने वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझे घर' योजनेचा लाभ घ्या; मुख्यमंत्री सावंतांचे गोमंतकीयांना आवाहन, 1972 पूर्वीची घरे नियमित होणार

Asia Cup 2025: IND vs PAK मॅच होणार नाही! आशिया कपमधून पाकिस्तान 'आऊट', आता 'या' देशाच्या संघाला मिळणार संधी

Viral Video: लहान मुलांना वाचविण्यासाठी जर्मन शेफर्डने बाल्कनीतून घेतली उडी; पाहा व्हिडिओ

Budget Friendly India Tour: दिल्ली, गोवा, जयपूर...14 दिवसांत भारत दर्शन; कसा कराल बजेटफ्रेन्डली प्रवास? वाचा प्लॅन

Viral Video: "असले मित्र नको रे बाबा!" धोकादायक मस्करीचा व्हिडिओ व्हायरल; त्याची 'ही' अवस्था पाहून नेटकरी संतप्त

SCROLL FOR NEXT