Share Market: Sensex Crossed 62 thousands first time in history Dainik Gomantak
अर्थविश्व

Share Market: सेन्सेक्स इतिहासात पहिल्यांदयाच 62 हजारांच्या पार

सलग आठव्या दिवशी देखील शेअर बाजारात (Share Market) तेजीच दिसत आहे. इतिहासात पहिल्यांदाच Sensex ने 62 हजारांचा टप्पा पार केला आहे .

दैनिक गोमन्तक

सलग आठव्या दिवशी देखील शेअर बाजारात (Share Market) तेजीच दिसत आहे. इतिहासात पहिल्यांदाच Sensex ने 62 हजारांचा टप्पा पार केला आहे . आज सकाळी सेन्सेक्स 394 अंकांच्या वाढीसह 62159 च्या पातळीवर उघडला आहे . सकाळी 10.50 वाजता सेन्सेक्स 186 अंकांच्या वाढीसह 61942 च्या पातळीवर व्यवहार करत होता. आतापर्यंत, ट्रेडिंग दरम्यान, Sensex 62198 चा उच्चांक गाठला आहे, जो एक नवीन विक्रम आहे. यावेळी Nifty 55 अंकांच्या वाढीसह 18531 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

एचडीएफसी बँक, एल अँड टी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या वाढीमुळे जागतिक बाजारपेठेत सकारात्मक कलजाणवत असल्याने झाल्यामुळे स्टॉक इंडेक्स सेन्सेक्स मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे 400 अंकांनी वाढून 62,000 चा टप्पा ओलांडला आहे . सेन्सेक्समध्ये तीन टक्क्यांची सर्वात मोठी वाढ एल अँड टी कंपनीच्या शेअर्समध्ये झाली आहे . बाजारात याशिवाय टेक महिंद्रा, एचसीएल टेक, एचयूएल, अॅक्सिस बँक आणि भारती एअरटेल या कंपन्यांनाही सर्वाधिक फायदा झाला आहे . तर दुसरीकडे, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, पॉवरग्रिड आणि कोटक बँकमध्ये घसरण दिसून येत आहे.

मागील सत्रात, सेन्सेक्स आठवड्याच्या पहिल्या दिवशी 459.64 अंकांनी वाढून 61,765.59 तर निफ्टी 138.50 अंकांनी वाढून 18,477.05 वर बंद झाला होता . शेअर बाजाराच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारी एकूण 512.44 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत

बाजाराचा विचार करता जागतिक पुरवठा साखळीवर वाईट परिणाम झाला आहे, तर वस्तूंच्या किमतीतही सातत्याने वाढ होत आहे. याचा थेट परिणाम महागाई दरावर होतोना दिसत आहे . जर महागाईचा दर वाढला तर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हसाठी त्यावर नियंत्रण ठेवणे हे मोठे आव्हान असेल. अमेरिकेच्या 10 वर्षांच्या बाँडचे उत्पन्न 1.6 टक्क्यांवर पोहोचले आहे. उत्पन्नात वाढ स्पष्टपणे दर्शवते की महागाई ही एक मोठी समस्या आहे आणि सर्वांच्या नजरा त्याकडे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Moths: फुलपाखरांसारखे दिवसा दिसत नसले तरी, रात्री बाहेर पडणाऱ्या 'पतंगांचे' स्थान महत्वाचे आहे..

Goa Assembly Live: तिसरा जिल्हा; मुख्यालयावरून आल्टन आक्रमक

IND vs ENG: मँचेस्टर कसोटी अनिर्णित, पण टीम इंडियाच्या नावावर लज्जास्पद विक्रम; 90 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं

Goa Monsoon Vegetables: चिप्स, बर्गर, पिझ्झा नको! गोव्यातील विद्यार्थ्यांनी घेतला पावसाळी रानभाज्यांचा आस्वाद

"गोयेंचो ताजमहाल सेंचुरी करता" कला अकादमीला आणखीन 20 कोटींचा खर्च; अधिवेशनापूर्वीच विजय सरदेसाईंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT