Share Market
Share Market 
अर्थविश्व

Share Market Update : आठवड्याच्या पहिल्याच सत्रात सेन्सेक्स व निफ्टीची घसरण 

दैनिक गोमन्तक

देशातील भांडवली बाजाराने आज आठवड्याच्या पहिल्याच सत्रात मोठी आपटी नोंदवली आहे. मागील आठवड्याच्या शेवटच्या सत्रात मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार दोन्ही खाली आले होते. त्यानंतर आज सकाळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 50,683.49 वर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 15,145.2 वर खुला झाला. आणि आजच्या पहिल्याच सत्रात देशातील सर्वात जुना भांडवली बाजार मुंबई शेअर बाजाराचा बीएसई 0.78 टक्क्यांनी आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक एनएसई 0.67 टक्क्यांनी घसरल्याचे पाहायला मिळाले.  

मागील आठवड्याच्या शेवटच्या सत्रात म्हणजेच शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 487.0 अंशांनी खाली येत 50,792.08 वर बंद झाला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 144.0 अंकांनी खाली येत 15,030.95 वर बंद झाला होता. त्यानंतर आजच्या आठवड्याच्या पहिल्या सत्रात सेन्सेक्स 397.0 अशांनी खाली येत 50,395.08 बंद झाला. तर निफ्टी देखील 101.45 अंकांनी खाली येत 14,929.50 च्या पातळीवर बंद झाला. यापूर्वी मागील आठवड्याच्या पहिल्या तीन सत्रात भांडवली बाजाराच्या दोन्ही निर्देशकांनी तेजी नोंदवली होती. मात्र त्यानंतर शेवटच्या सत्रात आणि आजच्या पहिल्या सत्रात दोन्ही निर्देशांक घसरले. 

आजच्या सत्रात गुंतवणूकदारांनी नफेखोरी दाखवल्यामुळे शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाल्याचे जाणकारांनी म्हटले आहे. आजच्या व्यवहारात ओएनजीसी, बँक ऑफ बरोडा, डॉक्टर रेड्डीज, कोटक महिंद्रा बँक,आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, सन फार्मा, लार्सन अँड टुब्रो, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, महाराष्ट्र बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो यांच्या समभागांमध्ये घसरण पाहायला मिळाली. तर एसबीआय, एशियन पेंट, मारुती सुझुकी, पॉवरग्रिड, सेंट्रल बँक, इंडसइंड बँक, आयटीसी, एचसीएल टेक, टीसीएस, टायटन, टेक महिंद्रा, एनटीपीसी या कंपन्यांचे समभाग वधारले.     

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

PM Modi In Goa : जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू; गोव्यातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT