Share Market Record High: सेन्सेक्सचा नवा रेकॉर्ड, निफ्टीनेही गाठला 24 हजारांचा टप्पा; गेल्या 4 दिवसांपासून मार्केटमध्ये तेजीचा ट्रेंड कायम!
Indian Share Market| Nifty Fifty Dainik Gomantak
अर्थविश्व

Share Market Record High: सेन्सेक्सचा नवा रेकॉर्ड, निफ्टीनेही गाठला 24 हजारांचा टप्पा; गेल्या 4 दिवसांपासून मार्केटमध्ये तेजीचा ट्रेंड कायम!

Manish Jadhav

भारतीय शेअर बाजारातील वादळी वाढ गुरुवारीही कायम राहिली. शेअर बाजारात सुरु असलेल्या तेजीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी सातत्याने नवे रेकॉर्ड प्रस्थापित करत आहेत. गुरुवारीही सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा रेकॉर्ड नोंदवत उच्चांक गाठला.

सेन्सेक्सने 79 हजारांची पातळी ओलांडली, तर निफ्टीने 24 हजारांची विक्रमी पातळी ओलांडली. तथापि, ट्रेडिंग सत्रात रेकॉर्ड उच्चांक गाठल्यानंतर दोन्ही निर्देशांकात घसरण झाली. सध्या सेन्सेक्स (Sensex) 269.62 अंकांनी वाढून 78943.87 वर व्यवहार करत आहे. तर निफ्टीही 76 अंकांच्या वाढीसह 23945 वर आहे.

सेन्सेक्सने सर्व रेकॉर्ड मोडले

दरम्यान, बीएसई सेन्सेक्सनेही आज 78,771.64 चा नवा उच्चांक गाठला. काल त्याने 78,759.40 ही सर्वोच्च पातळी गाठली होती. त्याचवेळी, मंगळवारी सेन्सेक्सने 78 हजारांचा टप्पा ओलांडला होता. म्हणजेच अवघ्या 15 दिवसांत सेन्सेक्सने नवा रेकॉर्ड केला आहे.

सकाळपासूनच बाजारात मर्यादित प्रमाणात व्यवहार होत होते. सेन्सेक्सचे शेअर्स बघितले तर त्यातील 30 शेअर्सपैकी 12 शेअर्स वाढीसह आणि 18 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. अल्ट्राटेक सिमेंट त्याच्या मोठ्या सिमेंट डीलच्या आधारे मार्केटमध्ये टॉप गेनर बनले आहे आणि त्यानंतर JSW स्टीलचा क्रमांक लागतो.

BSE चे मार्केट कॅपिटलायझेशन

मार्केट ओपन झाल्यावर बीएसईवर लिस्टेड स्टॉक्सचे मार्केट कॅप 437.02 लाख कोटी रुपये होते, परंतु अर्ध्या तासात ते 438.46 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. त्याचवेळी, मार्केट ओपन झाल्यानंतर एका तासानंतर म्हणजे सकाळी 10.12 वाजता हा मॅकॅप 439.07 लाख कोटी रुपयांचा झाला.

BSE वर व्यवहार झालेल्या 3296 शेअर्सपैकी 2060 शेअर्समध्ये वाढ होत आहे. 1122 शेअर्समध्ये घट झाली असून 114 शेअर्समध्ये (Shares) कोणताही बदल न होता व्यवहार होत आहेत.

या शेअर्संना फायदा आणि नुकसान झाले

अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स वाढले. आशियाई बाजारात दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई, हाँगकाँगचा हँग सेंग आणि चीनचा शांघाय कंपोझिट तोट्यात राहिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी एक जणाला अटक

NEET Exam: गोव्यातील चार हजार विद्यार्थ्यांवर अन्याय, ‘नीट’ परीक्षा पुन्हा घेण्याची NSUI ची मागणी

Mining Transport: खनिज वाहतूकप्रश्‍नी सरकारला कानपिचक्या! कोर्टाने केल्या महत्वाच्या सूचना

Goa Muder Case: दारूची अर्धी बाटली ठरली तरुणाच्या खूनाचे कारण; मद्यधुंद मित्रानेच काढला काटा

Drummer William D'souza: प्रसिद्ध गोमंतकीय ड्रमर विलियम यांचे निधन; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT