Share Market मध्ये येणार तेजी? जाणून घ्या, निवडणुकीच्या काळात कशी होती शेअर बाजाराची कामगिरी

Share Market During Elections: 2004 मध्ये देशात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले तेव्हा सहा महिन्यांमध्ये सेन्सेक्स 9.10 टक्क्यांनी वाढला होता. 2009 मध्ये पुन्हा काँग्रेसचे सरकार आल्यावर सहा महिन्यांत सेन्सेक्स 59.80 टक्क्यांनी वाढला.
Indian Share Market| Nifty Fifty
Indian Share Market| Nifty FiftyDainik Gomantak
Published on
Updated on

Boom in share market? Know how the stock market performed during the elections:

गेल्या महिन्यात सेन्सेक्सने 52 आठवड्यांची उच्चांक पातळी गाठली होती. 16 जानेवारी 2024 रोजी तो 73,427 अंकांवर गेला. सध्या सेन्सेक्स ७२,००० अंकांच्या जवळ आहे.

1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर फारसा परिणाम झाला नाही. आता गुंतवणूकदारांना आशा आहे की सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी बाजारात मोठी तेजी दिसून येईल.

डीआरएस फिनव्हेस्टचे संस्थापक डॉ. रवी सिंग यांनी इंडिया टीव्ही या हिंदी न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले की, सार्वत्रिक निवडणुकीच्या २-३ महिने आधी बाजारात अस्थिरता असणे सामान्य आहे. (Impact of Election on Stock Market)

डॉ.रवी यांच्या मते बाजाराला स्थिर सरकार आवडते. जुने सरकार पुन्हा आले की, धोरणात बदल होण्याची शक्यता फारच कमी असते. ही गोष्ट बाजाराला आधार देते. हेच कारण आहे की अत्यंत उच्च मूल्यांकन असूनही, भारतीय शेअर बाजारात सध्या तेजी पाहायला मिळत आहे.

यंदा भारतातच नव्हे तर अमेरिकेतही निवडणुका आहेत. अमेरिकेत या वर्षी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. भारतात सार्वत्रिक निवडणुका मे महिन्यात आणि अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये आहेत.

डॉ.रवी यांच्या म्हणण्यानुसार, राज्यांचे निवडणूक निकाल पाहता मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचे संकेत बाजारात मिळत आहेत. तथापि, निवडणूक आणि बाजार या दोन्ही गोष्टी आश्चर्यचकित करण्यासाठी ओळखल्या जातात.

Indian Share Market| Nifty Fifty
Facebook आणि Instagram च्या कमाईत तेजी, भारतातील आयफोनच्या विक्रमी विक्रीमुळे Apple मालामाल

यापूर्वी निवडणुकीच्या काळात कशी होती शेअर बाजाराची कामगिरी?

थोडं मागे गेलं तर 1984 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचं सरकार स्थापन झालं होतं. त्यावेळी निवडणूक निकालांच्या पहिल्या सहा महिन्यांत सेन्सेक्स 12.50 टक्क्यांनी घसरला होता.

1989 च्या निवडणुकीत जनता दलाचे सरकार स्थापन झाले. तेव्हा सहा महिन्यांत सेन्सेक्स केवळ ०.१० टक्के वाढला होता.

यानंतर 1991 मध्ये काँग्रेस सरकार स्थापन होण्यापूर्वी सेन्सेक्स 2.60 टक्क्यांनी वाढला होता. यानंतर 1996 मध्ये संयुक्त आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी बाजार 25.10 टक्क्यांनी वाढला होता.

Indian Share Market| Nifty Fifty
Gautam Adani: गौतम अदानी रचणार इतिहास; 10 हजार कोटींचं करणार 'हे' काम

यानंतर 1998 मध्ये भाजप सरकार येण्याच्या आधी सेन्सेक्स 9.30 टक्क्यांनी घसरला होता. 1999 मध्ये, जेव्हा पुन्हा भाजपचे सरकार स्थापन झाले, त्याआधीच्या 6 महिन्यांत सेन्सेक्स 31.60 टक्क्यांनी वाढला.

सॅमको सिक्युरिटीजच्या आकडेवारीनुसार, 2004 मध्ये देशात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले तेव्हा सहा महिन्यांमध्ये सेन्सेक्स 9.10 टक्क्यांनी वाढला होता. 2009 मध्ये पुन्हा काँग्रेसचे सरकार आल्यावर सहा महिन्यांत सेन्सेक्स 59.80 टक्क्यांनी वाढला.

यानंतर 2014 मध्ये भाजप सरकार सत्तेत येण्यापूर्वी सेन्सेक्सने 15.70 टक्के परतावा दिला होता. 2019 मध्ये भाजप सरकार पुन्हा सत्तेवर आले तेव्हा सेन्सेक्सने मागील 6 महिन्यांत 9.80 टक्के परतावा दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com