Share market growth (Symbolic) Dainik Gomantak
अर्थविश्व

ॲल्युमिनिअमच्या किमतीत होणारी वाढ म्हणजे 'हिंडाल्को'साठी शुभ संकेत

हिंडाल्को ही महसूलाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी ॲल्युमिनिअम कंपनी

Dainik Gomantak

Share Market: डोमेस्टिक ब्रोकरेज आणि रिसर्च फर्म असलेल्या आयसीआयसीआय सिक्युरिटीजचा (ICICI Securities) विश्वास आहे की ॲल्युमिनिअमच्या चांगल्या किमतीं आणि नोवेलिसची (Novelis) चांगली कामगिरी हिंडाल्कोसाठी (Hindalco) सकारात्मक संकेत देत आहेत.

हिंडाल्को ही महसूलाच्या दृष्टीने विचार केल्यास जगातील सर्वात मोठी ॲल्युमिनिअम कंपनी आहे आणि तांब्याच्या क्षेत्रातही हिंडाल्कोचे नाव मोठे आहे. त्याची संपूर्ण मालकीची उपकंपनी नोवेलिस ही जगातील सर्वात मोठी ॲल्युमिनिअम बेवरेज कॅनचे स्टॉक उत्पादक कंपनी आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजला आपल्या स्टॉकमध्ये अजून वाढ अपेक्षित आहे, त्यामुळेच हिंडाल्कोच्या शेअर्सवर 'Buy' रेटिंग अजूनही आहे, जे 650 रुपयांच्या किंमतीने विशेष उद्दिष्ट ठेऊन सुमारे 12 महिन्यांच्या कालावधीपासून आहे.

चालू कॅलेंडर वर्षात एलएमईवर जागतिक ॲल्युमिनिअमच्या किमतीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. एलएमईवरील ॲल्युमिनिअमचे दर 4 जानेवारी 2021 मध्ये US $ 2028/टन वरून 15 ऑक्टोबर 2021 रोजी US $ 3149/टन झाले आहेत, जे या कालावधीत तब्बल 55 टक्क्यांची वाढ दर्शविते. हिंडाल्को (घरगुती कामकाज) सारख्या एकात्मिक कंपनीसाठी ॲल्युमिनिअमच्या किंमतींमध्ये झालेली वाढ म्हणजे म्हणजे शुभ संकेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Goa Assembly Election 2027: 'मी निवडणूक लढवणारच!', हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकरांनी ठोकला शड्डू; लोबोंसमोर आव्हान

खरी कुजबुज: मॅडमचा भलताच तोरा

Goa Medical College: ईएसआयसी मेडिकल कॉलेजमध्ये स्थानिकांना 50 टक्के राखीव जागा, राष्ट्रीय आरक्षण धोरणानुसार होणार भरती; गोमंतकीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर

Post Truth Politics In India: इव्हीएम, 'एसआयआर' अन् निवडणूक आयोग... विरोधकांकडून तीन प्रमुख मुद्द्यांवरून खोटा प्रचार?

SCROLL FOR NEXT