ITR भरायचाय.. लोन घ्यायचय.. मग ते 31 ऑक्टोबर पूर्वीच घ्या

31ऑक्टोबर ही (October) अनेक महत्वाची कामे करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही कामे झाली आहेत का ते पहा, अन्यथा तुम्हाला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागेल.
31 ऑक्टोबरपर्यंत (October) अनेक महत्वाची कामे करण्याची शेवटची तारीख आहे.
31 ऑक्टोबरपर्यंत (October) अनेक महत्वाची कामे करण्याची शेवटची तारीख आहे.Dainik Gomantak
Published on
Updated on

ऑक्टोबर (October) महिना संपण्यासाठी (31 ऑक्टोबर) फक्त 10 दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत, 31 ऑक्टोबरपर्यंत अनेक महत्वाची कामे करण्याची शेवटची तारीख आहे. या दरम्यान, जर तुम्ही घर (Home) घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. त्याचबरोबर पीएम किसान योजनेत (PM Kisan) नोंदणीची अंतिम तारीख देखील 31 ऑक्टोबर आहे.

31 ऑक्टोबरपर्यंत (October) अनेक महत्वाची कामे करण्याची शेवटची तारीख आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किंमती 'वाढता वाढता वाढे'...

HDFC विशेष ऑफर

जर तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर गृहनिर्माण वित्त कंपनी एचडीएफसी (एचडीएफसी होम लोन) ची विशेष ऑफर या महिन्यात 31 ऑक्टोबरला संपणार आहे. एचडीएफसीने सणांचा हंगाम लक्षात घेऊन गृहकर्जाचे दर कमी केले आहेत. या अंतर्गत ग्राहक प्रारंभिक 6.70% व्याज दराने गृहकर्ज घेऊ शकतात. ही विशेष योजना 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत उपलब्ध असेल.

एसबीआय ग्राहक करू शकतात विनामूल्य आयटीआर दाखल

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक आता विनामूल्य आयकर रिटर्न (ITR) दाखल करू शकतात. एसबीआय ग्राहक YONO अॅपवर Tax2Win मधून ITR दाखल करू शकतात. एसबीआयने सोशल मीडियाद्वारे सांगितले की तुम्ही योनो वर टॅक्स 2 विन द्वारे ITR विनामूल्य दाखल करु शकता. पण ही ऑफर फक्त 31 ऑक्टोबर पर्यंत आहे.

31 ऑक्टोबरपर्यंत (October) अनेक महत्वाची कामे करण्याची शेवटची तारीख आहे.
व्यावसायिक कर्ज पाहिजे? 'या' कागदपत्रांची लागेल आवश्यकता

पीएम किसान योजनेसाठी नोंदणी

पीएम किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) अंतर्गत नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे. जर त्यांनी या कालावधीत स्वतःची नोंदणी केली तर त्यांना दोन हप्ते मिळतील म्हणजे त्यात शेतकऱ्यांना 4 हजार रुपयांचा लाभ मिळेल.

वाहन नोंदणी आणि DL चे नूतनीकरण

तुमच्या वाहनाची नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स आणि फिटनेस प्रमाणपत्र यासारख्या कागदपत्रांच्या नूतनीकरणाची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला देखील ही कागदपत्रे नूतनीकरण करायची असतील तर ती लवकर करा. तुम्ही असे न केल्यास तुम्हाला अडचणीला सामोरे जावे लागू शकते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स (DL), नोंदणी प्रमाणपत्र (RC) आणि परमिटची वैधता 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com