Shaktikanta Das reappointed as a RBI Governor Dainik Gomantak
अर्थविश्व

शक्तिकांत दासच RBI चे गव्हर्नर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

शक्तीकांता दास (Shaktikanta Das) हे यापूर्वी अर्थ मंत्रालयात आर्थिक व्यवहार सचिव होते. आणि त्यांची 11 डिसेंबर 2018 रोजी सेंट्रल बँक RBI चे प्रमुख म्हणून तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती.

दैनिक गोमन्तक

केंद्र सरकारने RBI गव्हर्नर बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांचा RBI गव्हर्नर (RBI Governor) पदाचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेत पुढील 3 वर्षांसाठी त्यांची आरबीआय गव्हर्नर म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने गुरुवारी रात्री उशिरा या निर्णयाला मंजुरी दिली आहे . शक्तीकांता दास हे यापूर्वी अर्थ मंत्रालयात आर्थिक व्यवहार सचिव होते. आणि त्यांची 11 डिसेंबर 2018 रोजी सेंट्रल बँक RBI चे प्रमुख म्हणून तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. (Shaktikanta Das reappointed as a RBI Governor)

शक्तिकांत दास यांना शासनाच्या विविध क्षेत्रांचा मोठा अनुभव आहे आणि त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वित्त, कर, उद्योग इत्यादी क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.भारत सरकारच्या वित्त मंत्रालयातील त्यांच्या दीर्घ कार्यकाळात त्यांनी 8 केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्यात सहभाग घेतला होता. पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना 2008 मध्ये पहिल्यांदाच शक्तीकांता दास यांची संयुक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

शक्तीकांता दास यांनी जागतिक बँक, आशियाई विकास बँक (ADB), न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB) आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) मध्ये भारताचे पर्यायी गव्हर्नर म्हणूनही काम केले आहे. IMF, G20, BRICS, SAARC इत्यादी आंतरराष्ट्रीय मंचांवर त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व देखील केले आहे.

कसे निवडले जातात RBI गव्हर्नर

RBI कायदा हा सरकारला RBI गव्हर्नरचा कार्यकाळ ठरवण्याचा अधिकार देतो खरा परंतु तो पाच वर्षांपेक्षा जास्त असू शकत नाही.हेही त्या कायद्यात नमूद करण्यात आले आहे. मात्र, सरकारची इच्छा असेल तर ते सलग दुसऱ्यांदा सरकार आरबीआयच्या गव्हर्नरपदावर कोणाचीही नियुक्ती करू शकते. अलिकडच्या वर्षांत, फक्त एस. व्यंकटरमण यांचा कार्यकाळ रघुराम राजन यांच्यापेक्षा कमी होता. ते फक्त 2 वर्षे RBI गव्हर्नर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT