Share Market  Dainik Gomantak
अर्थविश्व

पहिल्या दिवसाच्या तेजीत गुंतवणूकदारांनी कमावला नफा तर आज सेन्सेक्समध्ये मोठी घसरण

आज सकाळी सेन्सेक्स 303 अंकांनी घसरून 55622 च्या पातळीवर तर निफ्टी 83 अंकांच्या घसरणीसह 16578 च्या पातळीवर उघडला.

दैनिक गोमन्तक

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात 1041 अंकांची उसळी पाहायला मिळाली . दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांनी पुन्हा नफा कमावला, त्यामुळे बाजार घसरणीसह उघडला. आज सकाळी सेन्सेक्स 303 अंकांनी घसरून 55622 च्या पातळीवर तर निफ्टी 83 अंकांच्या घसरणीसह 16578 च्या पातळीवर उघडला.

सुरुवातीच्या 15 मिनिटांत सेन्सेक्स 500 हून अधिक अंकांनी घसरला आणि तो 55423 च्या पातळीवर घसरला. निफ्टी 16531 पर्यंत घसरला. महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील, पॉवरग्रीड आणि मारुती सेन्सेक्समधील टॉप-30 कंपन्यांमध्ये आहेत. इन्फोसिस, टायटन आणि एचडीएफसी सारख्या समभागात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

सेक्टरल अपडेट्स

शेअर बाजारातील घसरणीदरम्यान, बँकिंग, आयटी, एफएमसीजी, फार्मा यांसारख्या क्षेत्रातील समभागांमध्ये घट झाली आहे, तर ऑटो, ऊर्जा, रिअल इस्टेट यासारख्या क्षेत्रांमध्ये थोडीशी वाढ झाली आहे. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 16 समभाग हिरव्या चिन्हासह व्यवहार करत आहेत आणि 34 समभागांमध्ये घसरण होत आहे. त्यामुळे सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 5 शेअर्स हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत. तर 25 समभाग लाल चिन्हात व्यवहार करत आहेत.

वाढत्या समभागांवर नजर टाकल्यास, महिंद्रा 1.89 टक्के, पॉवर ग्रिड 1.55 टक्के, टाटा स्टील 0.82 टक्के, आयटीसी 0.26 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.20 टक्के, मारुती सुझुकी 0.18 टक्के, लार्सन 0.09 टक्के आणि रिलायन्सनेही हिरवा चिव्हात व्यापार केला.

आजचे टॉप लूजर्सचे

शेअर्स बघितले तर सन फार्मा 2.49 टक्के, इन्फोसिस 2.07 टक्के, एचडीएफसी 2.05 टक्के, टायटन 1. 98 टक्के, एचसीएल टेक 1.28 टक्के, कोटक महिंद्रा 1.09 टक्के, टीसीएस 1 टक्के, एचयूएल 0.91 टक्के घसरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT