SBI rises fond 6000 crore by issuing bonds
SBI rises fond 6000 crore by issuing bonds Dainik Gomantak
अर्थविश्व

SBI ने बॉण्ड विकून उभे केले 6 हजार कोटी रुपये

Abhijeet Pote

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने बेसल तीन मानकांनुसार बॉण्ड (Bond) जारी करून 6,000 कोटी रुपये उभारले आहेत. बँकेला 14,000 कोटी रुपयांपर्यंतचे अतिरिक्त इक्विटी कॅपिटल (Equity Capital) उभारण्यासाठी जूनमध्ये केंद्रीय संचालक मंडळाकडून मंजुरी मिळाली होती. भारतीय स्टेट बँकेने स्टॉक एक्स्चेंजला (Stock Exchange) दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, 18 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या संचालक समितीच्या बैठकीत भांडवल उभारणीसाठी बेसल III अनुरूप बंधपत्र जारी करून 6,000 कोटी रुपये उभारण्यास मान्यता दिली गेली आहे. (SBI rises fond 6000 crore by issuing bonds)

एसबीआयने सांगितले की बॉण्डवर वार्षिक व्याज 7.72 टक्के आहे. शाश्वत बाँड्सची परिपक्वता तारीख नसते, म्हणून त्यांना इक्विटी म्हणून मानले जाऊ शकते. एसबीआयचे शेअर बीएसईवर 497.85 रुपयांवर व्यवहार करत आहेत , जे 1.50 टक्क्यांनी वाढले आहे.

गेल्या महिन्यातही एसबीआयने बेसल-फ्रेंडली अतिरिक्त टियर 1 (एटी -1) बाँडद्वारे 4,000 कोटी रुपये उभारले होते . बँकेने जारी केलेल्या रोख्यांवर गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद आहे. बँकेला स्थानिक क्रेडिट रेटिंग एजन्सींकडून AAA म्हणजेच ट्रिपल-ए रेटिंग मिळाले आहे. बँकेच्या AT1 ऑफरला AA+ रेटिंग मिळाले आहे. बाजारात या प्रकारच्या बाँडसाठी हे सर्वोच्च रेटिंग मानले जाते.

AT1 बॉण्ड म्हणजे नेमकं काय

या AT1 बॉण्ड टियर 1 बॉण्ड असेही म्हणतात. असे बॉन्ड हे कायमचे बॉन्ड असतात ज्यांची मुदत संपत नाही. बँका त्यांच्या पैशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बॉण्ड जारी करतात. AT1 बाँड रिझर्व्ह बँकेद्वारे नियंत्रित केले जातात. यामध्ये नियमित अंतराने व्याज दिले जाते. जर तुम्ही बॉण्ड घेतला असेल आणि जेव्हा तुम्हाला पैशाची गरज असेल तेव्हा तुम्ही ते विकू शकता आणि तुम्हाला ताबद्ल्यात पैसे मिळतात.

अलीकडेच, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सोमवारी विविध मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल स्टेट बँकेला 1 कोटी रुपये आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला 1.95 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. व्यापारी बँका आणि निवडक वित्तीय संस्थांकडून फसवणूक वर्गीकरण आणि अहवाल दिशानिर्देश 2016 मधील निर्देशांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयने एसबीआयला दंड ठोठावला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: खोर्ली-म्हापसा येथे आढळला पुरुषाचा मृतदेह

SSC Result Sanguem : सांगे तालुक्यात सरकारी शाळांची बाजी; दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

Ponda News : दारूच्या नशेत पर्यटकांची दादागिरी; दाभाळ येथील प्रकार

Dengue News : डेंग्यू निर्मूलनासाठी लोकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे : आरोग्य उपसंचालक डॉ.कल्पना महात्मे

SCROLL FOR NEXT