SBI Dainik Gomantak
अर्थविश्व

एसबीआयने करोडो ग्राहकांसाठी सुरु केली नवी सेवा, आधार क्रमांकाने होणार 'हे' काम

Social Security Schemes: बँकेचे ग्राहक त्यांचा आधारकार्ड क्रमांक वापरुन विविध सामाजिक सुरक्षा योजनांसाठी नावनोंदणी करु शकतात.

Manish Jadhav

Atal Pension Yojana: स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरु केली आहे. बँकेचे ग्राहक त्यांचा आधारकार्ड क्रमांक वापरुन विविध सामाजिक सुरक्षा योजनांसाठी नावनोंदणी करु शकतात.

बँकेने 25 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. SBI ग्राहकांना सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये नोंदणीसाठी पासबुकची गरज नाही.

नोंदणीसाठी आधारकार्ड आवश्यक

आता SBI च्या ग्राहक सेवा केंद्रांना (CSP) भेट देणाऱ्या ग्राहकांना (Customers) सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये नोंदणीसाठी आधारकार्ड आवश्यक असेल.

SBI ची प्रणाली नोंदणी प्रक्रिया जलद करते. त्यामुळे हे काम पूर्वीपेक्षा अधिक सोयीचे होणार आहे. प्रेस नोटमध्ये असे सांगण्यात आले की, SBI चे ग्राहक सेवा केंद्र (CSP) हे किओस्क आहेत जे SBI ग्राहकांना व्यवहार करण्याची सुविधा देतात.

प्राधान्य सामाजिक सुरक्षा योजना

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY)

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY)

अटल पेन्शन योजना (APY)

या संदर्भात एसबीआयचे (SBI) अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की, 'आर्थिक सुरक्षिततेच्यासंबंधी कोणत्याही प्रकारचा अडथळा दूर करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर सामाजिक सुरक्षा योजनांची व्याप्ती लक्षणीयरीत्या वाढण्याचा आमचा मानस आहे.

या योजनांचा लाभ ज्यांना त्याची सर्वाधिक गरज आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल. कागदोपत्री काम कमी करुन ग्राहकांना सुविधा देण्याचा उद्देश आहे.'

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) ही जीवन विमा आहे. 18 ते 50 वयोगटातील खातेधारक ही पॉलिसी घेऊ शकतात. डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वेबसाइटनुसार, त्याचे थेट कव्हर 2 लाख रुपये असून वार्षिक प्रीमियम 436 रुपये आहे. हा प्रीमियम कोणत्याही व्यक्तीच्या बँक खात्यातून ऑटो-डेबिट केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT