SBI  Dainik Gomantak
अर्थविश्व

SBI Online: एसबीआयच्या करोडो ग्राहकांना मोठा झटका, 17 मार्चपासून होणार 'हा' बदल

SBI Latest News: देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत खाती असलेल्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. तुमचेही SBI मध्ये खाते असेल तर बँकेने मोठा धक्का दिला आहे.

Manish Jadhav

SBI Online: देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत खाती असलेल्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. तुमचेही SBI मध्ये खाते असेल तर बँकेने मोठा धक्का दिला आहे. यापुढे तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील.

17 मार्च 2023 पासून बँक काही बदल करणार आहे, ज्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे. पुढच्या महिन्यापासून काय बदल होणार आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे शुल्क वाढेल

ग्राहकांना (Customers) माहिती देताना, SBI कार्ड आणि पेमेंट सर्व्हिसेसने सांगितले आहे की, SBI क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांवर याचा मोठा परिणाम होईल. बँकेने कार्ड शुल्कात वाढ केली आहे. ही दुरुस्ती 17 मार्च 2023 पासून लागू होईल.

मेल केलेली माहिती

एसबीआय कार्डवरुन मेसेज आणि मेल पाठवून याबाबत माहिती देण्यात आली आहे. SBI कार्ड्सने सांगितले आहे की, क्रेडिट कार्डद्वारे त्यांचे भाडे भरणाऱ्या वापरकर्त्यांना आता 199 रुपये आणि इतर लागू कर आकारले जातील.

सुधारित दर लागू होतील

नोव्हेंबर 2022 मध्ये, SBI ने क्रेडिट कार्डच्या (Credit Card) भाड्यात पेमेंट शुल्क 99 रुपये अधिक 18% GST वाढवले ​​होते, परंतु 99 रुपये अधिक लागू करांऐवजी आता त्यांच्याकडून 199 रुपये अधिक कर आकारले जातील. याबाबत ग्राहकांना माहिती देण्यात आली. ग्राहकांना माहिती देताना बॅंकेने सांगितले की, नवीन दर लवकरच लागू केले जातील.

यापूर्वीही अनेक बँकांनी वाढ केली आहे

SBI कार्डने सांगितले आहे की, आम्ही भाड्याच्या पेमेंटमध्ये प्रोसेसिंग फी वाढवत आहे. SBI क्रेडिट कार्ड भाडे देय व्यवहारावरील शुल्क सुधारित केले जात आहेत. याआधी आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि कोटक बँक यांनीही वाढ केली आहे.

त्याचबरोबर, 15 फेब्रुवारी 2023 पासून, कोटक बँकेने व्यवहाराच्या रकमेपैकी 1 टक्के आणि GST शुल्क वसूल केले आहे. त्याचबरोबर बँक ऑफ बडोदाने 1 टक्के व्यवहार शुल्क देखील आकारले आहे. HDFC बँकेनेही रिवॉर्ड पॉइंट्स बदलले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

SCROLL FOR NEXT