SBI  Dainik Gomantak
अर्थविश्व

SBI ने केली मोठी घोषणा, आता ग्राहकांना मिळणार असे फायदे...!

SBI Scheme Update: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI (State Bank Of India) तुमच्यासाठी एक खास सुविधा घेऊन आली आहे.

Manish Jadhav

SBI Scheme Update: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI (State Bank Of India) तुमच्यासाठी एक खास सुविधा घेऊन आली आहे.

जर तुमचेही SBI (SBI Account) मध्ये खाते असेल तर आता तुम्हाला मोठा फायदा होणार आहे.

माहिती देताना, SBI ने सांगितले की, PPF (PPF योजना), सुकन्या समृद्धी योजना (SSY), राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) मध्ये पैसे गुंतवले असतील तर सरकारी बँक आणि केंद्र सरकारकडून विशेष सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. एसबीआयने आपल्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत ट्विट केले आहे.

1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे

1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही कर वाचवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आजपासूनच गुंतवणूक सुरु करु शकता.

एसबीआयने ट्विट केले आहे

एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, तुमचे भविष्य सुधारण्यासाठी तुम्ही आजपासून हा प्रवास सुरु करु शकता. यासाठी तुम्हाला सरकारी योजनेत पैसे गुंतवावे लागतील.

PPF योजनेत किती व्याज मिळते?

पीपीएफ ही एक सरकारी योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवून कर वाचवू शकता. तुम्ही पीपीएफमध्ये कमीत कमी 1 वर्षात 500 रुपयांपर्यंत गुंतवणूक (Investment) करु शकता, जर तुम्ही 1 वर्षात PPFमध्ये 1.5 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळेल. या योजनेवर तुम्हाला 7.10 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळत आहे.

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजनेत, 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचे खाते तिचे पालक उघडू शकतात. यामध्ये तुम्ही फक्त 250 रुपयांच्या गुंतवणुकीने खाते उघडू शकता. तुम्ही कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता. यामध्ये तुम्हाला 7.6 टक्के दराने व्याज मिळते. या योजनेतही तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळतो.

SBI कर बचत योजना

या योजनांव्यतिरिक्त, SBI कडून कर बचतीची सुविधा देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये पैसे गुंतवून तुम्ही कर वाचवू शकता आणि मोठे फायदे मिळवू शकता.

अधिकृत लिंक पाहा

याविषयी अधिक माहितीसाठी, तुम्ही https://bank.sbi/web/personal-banking/investments-deposits/govt-schemes या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT