Women Saving Scheme:
Women Saving Scheme: Dainik Gomantak
अर्थविश्व

Women Saving Scheme: 2 महिन्यांत 5 लाख महिलांनी सुरू केली बचत, जाणून घ्या कुठे

Puja Bonkile

Women Saving Scheme: 1 एप्रिल 2023 पासून महिलांसाठी (Women) सुरू करण्यात आलेली विशेष बचत योजना म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना महिलांसाठी खुप फायदेशीर ठरली आहे. ही योजना  सुरू झाल्यापासून दोन महिन्यांत 5 लाख महिलांनी या योजनेत पैसे गुंतवले आहेत. 

मे अखेरपर्यंत या योजनेत एकूण 3,636 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. याचा अर्थ महिला गुंतवणूकदारांनी यामध्ये सरासरी 73,000 रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. 

या योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा दोन लाख रुपये आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचे (MSSC) अकाउंट सध्या पोस्ट ऑफिसमध्येच (Post Office) उघडले जात आहे. आगामी काळात बँकांमध्येही अकाउंट उघडली जातील.

दोन वर्षांच्या कालावधीची ही योजना अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात जाहीर केली होती. महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये गुंतवणुकीसाठी 7.5 टक्के वार्षिक व्याज (MSSC व्याज दर) प्राप्त होत आहे. 

गुंतवणुकीवर (Investment) टीडीएस कापला जात नाही, परंतु गुंतवणूकदाराला मिळालेल्या व्याजावर कर स्लॅबनुसार कर भरावा लागेल. या योजनेत मार्च 2023 पर्यंतच गुंतवणूक करता येईल. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत फक्त महिलाच (Women) अकाउंट उघडू शकतात. अल्पवयीन मुलींच्या नावाने पालक खाते उघडू शकतात.

  • गुंतवणूक आणखी वाढेल

इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दोन वर्षांच्या मुदतीच्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत आणखी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. सध्या बँकांमध्ये (Bank) या योजनेची खाती उघडली जात नाहीत. 

बँका ही योजना राबवण्याच्या तयारीत आहेत. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची खाती बँकांमध्ये उघडण्यास सुरुवात झाल्यावर या योजनेत पैसे गुंतवणाऱ्या महिलांची संख्या आणखी वाढेल.

  • ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणुकीतही वाढ झाली

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2023 मध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट करून 30 लाख रुपये केली होती. सरकारच्या या निर्णयानंतर या योजनेत खर्च होणारा पैसाही (Money) वाढला आहे.

या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांतच ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत 23,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत हा आकडा 6,000 कोटी रुपये होता. 

गुंतवणुकीची मर्यादा वाढवल्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येतो. जून तिमाहीत ज्यांनी या योजनेत पैसे ठेवले त्यांना 8.2 टक्के वार्षिक व्याज मिळाले. त्याच वेळी, गेल्या तिमाहीत व्याज दर 8 टक्के होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT