Ration Card Dainik Gomantak
अर्थविश्व

Ration Card: रेशनकार्डधारकांचे बल्ले-बल्ले, मोदी सरकारने सुरु केली नवी सुविधा; 2024 पर्यंत...

Ration Card Latest News: तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल आणि तुम्ही सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Manish Jadhav

Ration Card Latest News: तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल आणि तुम्ही सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) द्वारे 269 जिल्ह्यांमध्ये फोर्टिफाइड तांदूळ (पोषक घटकांनी समृद्ध) वितरित केला जात आहेत.

देशातील उर्वरित जिल्हे मार्च 2024 च्या अंतिम मुदतीपूर्वी कव्हर केले जातील. केंद्रीय खाद्य सचिव संजीव चोप्रा यांनी ही माहिती दिली.

ही योजना ऑक्टोबर 2021 मध्ये सुरु करण्यात आली होती

PM मोदींनी 2021 मध्ये सांगितले होते की, 2024 पर्यंत, सरकारी योजनांद्वारे संपूर्ण देशात फोर्टिफाइड तांदूळ वितरित करण्याचे सरकारचे (Government) लक्ष्य आहे.

या घोषणेनंतर, लहान मुले आणि महिलांमधील अशक्तपणाच्या समस्येवर मात करण्यासाठी, सूक्ष्म अन्नद्रव्ये असलेल्या फोर्टिफाइड तांदूळ वितरणाची योजना ऑक्टोबर 2021 मध्ये टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली.

केंद्र सरकारचा अनोखा आणि यशस्वी उपक्रम

चोप्रा म्हणाले की, मागील दोन टप्प्यात फोर्टिफाइड तांदूळ वितरण यशस्वीरित्या राबविण्यात आले आहे.

ते पुढे म्हणाले की, 'केंद्र सरकारचा हा एक अनोखा आणि अतिशय यशस्वी उपक्रम असून, गेल्या दोन वर्षांत त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. लोकांकडून मिळालेल्या प्रतिसादाने आम्ही खूप उत्साहित आहोत.

यापूर्वी, काही गैरसमज झाले होते, मात्र ते दूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे निरोगी भारताचा (India) पाया रचला जाईल, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, 'आम्ही आतापर्यंत 269 जिल्ह्यांमध्ये पीडीएस (रेशन दुकाने) द्वारे फोर्टिफाइड तांदूळ वितरण सुरु केले आहे. ज्या गतीने आपण प्रगती करत आहोत, उर्वरित जिल्हे मुदतीपूर्वी योजनेच्या कक्षेत आणले जातील.

ते पुढे म्हणाले की, देशात सुमारे 735 जिल्हे आहेत, त्यापैकी 80 टक्क्यांहून अधिक लोक भात खातात. चोप्रा पुढे म्हणाले की, देशात पुरेसा फोर्टिफाइड तांदूळ आहे, कारण सध्या या तांदळाची उत्पादन क्षमता सुमारे 17 लाख टन आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

ओळखणंही झालं कठीण! WWE दिग्गज John Cenaचा धक्कादायक लूक; फोटो पाहून चाहतेही अवाक्!

Ardh Kendra Yog 2026: बँक बॅलन्स वाढणार, सगळ्या चिंता मिटणार! 'अर्धकेंद्र योग' बदलणार 5 राशींचे भाग्य; धनाचा होणार वर्षाव

Bicholim Heavy Rain: डिचोलीत पावसाचा पुन्हा तडाखा; दोन ठिकाणी झाडे कोसळली

Indus Waters Treaty Row: "...तर हात कापून टाकू!" सिंधु जल करारावरुन पाकिस्तानी मंत्र्यांचा जळफळाट; दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकड्यांची भारताविरोधात आगपाखड

SCROLL FOR NEXT