Rupee-Dollar Latest News | Rupee falls sharply against dollar Dainik Gomantak
अर्थविश्व

डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण; आता 1 डॉलरसाठी मोजावे लागतील इतके पैसे

दैनिक गोमन्तक

आज डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये विक्रमी घसरण झाली आहे. ही घट 21 पैशांनी झाली आहे. आज प्रति डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 77.13 रुपये झाली असून असून शुक्रवारी हीच किंमत 76.92 रुपये प्रति डॉलर इतकी होती. रुपयाची आजवरची ही सर्वात मोठी घसरण असून रुपया आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर आल्याचे म्हटले जात आहे. (Rupee-Dollar Latest News)

सुरुवातीच्या व्यापारातच, भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 77.20 रुपये प्रति डॉलरवर आला होता, म्हणजेच 1 डॉलरसाठी आपल्याला 77.20 रुपये मोजावे लागतील. शुक्रवारी, तो 77.05 च्या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर आला आहे.

रुपयाच्या घसरणीचे कारण काय?

सुरक्षित जागतिक बाजारपेठेत पैसे गुंतवण्याचा गुंतवणूकदारांचा निर्णय, रशिया-युक्रेन युद्ध युरोपात पोहोचण्याची भीती आणि वाढलेले व्याजदर याचा परिणाम शेअर बाजारावर झाला असून; हेच रुपयाच्या घसरणीमागचे कारण सांगण्यात येत आहे.

डॉलर निर्देशांक त्याच्या दोन दशकांच्या (20-वर्ष) उच्च पातळीवर पोहोचला आहे आणि सलग पाच आठवडे वरच्या पातळीवर राहिला आहे. फेडरल रिझर्व्हने अलीकडेच बेंचमार्क फंड रेट 0.50 टक्क्यांनी वाढवले ​​आहेत, ज्यामुळे डॉलरचे जागतिक मूल्य वाढले आहे. त्याच वेळी, भारतीय बाजारातील सध्याच्या शंकांमुळे, रुपयासाठी गुंतवणूकदारांची भावना कमकुवत झाली आहे आणि आज तो आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT