Bank Rules Dainik Gomantak
अर्थविश्व

Change In Bank Rules: लवकरच बदलणार आयकर, बँक लॉकर, म्युच्युअल फंडाशी संबंधित नियम

Monthly Budget : जून महिन्यात पैसे आणि बॅंकेशी संबंधित असे अनेक बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर आणि मासिक बजेटवर होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Change In Bank Rules: जून महिना बॅंक ग्राहकांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. या महिन्यात बॅंक आणि पैशाशी संबंधित असे अनेक नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर आणि मासिक बजेटवर होईल. अशा परिस्थितीत या बदलांची ग्राहकांना माहिती असणे गरजेचे आहे.

RBI चे चलनविषयक धोरण

RBI ची आर्थिक वर्ष 2023-24 मधील दुसरी पतधोरण घोषणा 8 जून रोजी होणार आहे. RBI ने आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने कर्जदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

जून एमपीसीच्या बैठकीत दर स्थिर राहतो की दरात वाढ होते हे पाहावे लागेल. रेपो दर वाढल्यास बँका पुन्हा एकदा कर्जावरील व्याजदर वाढवतील.

सुधारित लॉकर करार

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), बँक ऑफ बडोदा आणि इतर काही बँका त्यांच्या शाखांमध्ये लॉकर असलेल्या ग्राहकांना 30 जून 2023 पर्यंत सुधारित लॉकर करारावर स्वाक्षरी करण्याचे आवाहन करत आहेत.

बँक लॉकरबाबत बँकांच्या कराराचे नूतनीकरण करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे, परंतु आरबीआयने बँकांना ३० जून २०२३ पर्यंत ५० टक्के आणि ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत ७५ टक्के नूतनीकरण करण्यास सांगितले आहे.

मुलांच्या नावे म्युच्युअल फंडात गुंतवणूक शक्य

बाजार नियामक सेबी (SEBI) ने म्युच्युअल फंड योजनांबाबत नवा नियम जारी केला आहे. या नियमानुसार आता पालकही त्यांच्या मुलांच्या नावावर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतील. हा नवा नियम १५ जूनपासून लागू होणार आहे.

इनसाइडर ट्रेडिंगला बसणार चाप

फ्रंट रनिंग आणि इनसाइडर ट्रेडिंग यांसारख्या फसवणुकीचा शोध घेण्यासाठी सेबीने मॉनिटरिंग आणि अंतर्गत नियंत्रण प्रणाली स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

SEBI ने म्हटले आहे की, अशी प्रणाली फ्रंट-रनिंग, इनसाइडर ट्रेडिंग, उत्पादनांची चुकीची विक्री, मालमत्ता व्यवस्थापन कंपनी, कर्मचारी, वितरक, दलाल, डीलर्स यांच्याकडून माहितीचा गैरवापर शोधण्यात सक्षम असावी. नियामकाने या प्रस्तावांवर ३ जूनपर्यंत प्रतिक्रिया मागवल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: राष्ट्रीय महामार्ग अनमोड येथे खचल्याने अनमोड घाटावरुन जाण्यास अवजड वाहनांना प्रवेश बंद

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT