Royal Enfield Classic 650 Dainik Gomantak
अर्थविश्व

Royal Enfield Classic 650: रॉयल एनफील्डने लॉन्च केली 'क्लासिक 650'! जबरदस्त लूक, शानदार फिचर्स; जाणून घ्या किंमत

Royal Enfield Classic 650 Launch: प्रीमियम क्रूझर बाईक कंपनी रॉयल एनफील्डने भारतीय बाजारात एक नवीन बाईक 'रॉयल एनफील्ड क्लासिक 650' लॉन्च केली आहे.

Manish Jadhav

Royal Enfield Launches Classic 650 In India

प्रीमियम क्रूझर बाईक कंपनी रॉयल एनफील्डने भारतीय बाजारात एक नवीन बाईक 'रॉयल एनफील्ड क्लासिक 650' लॉन्च केली आहे. नवीन क्लासिक 650 हे कंपनीच्या मोठ्या क्षमतेच्या 650 सीसी लाइन-अपमधील सहावे मॉडेल आहे. क्लासिक 650 मध्ये या श्रेणीतील इतर प्रमुख मॉडेल्सप्रमाणेच इंजिन वापरण्यात आले आहे. गेल्या वर्षी मिलान ऑटो शोमध्ये ही बाईक पहिल्यांदाच प्रदर्शित करण्यात आली होती. तिला रॉयल एनफील्डची सर्वात लोकप्रिय बाईक 'क्लासिक' असे नाव देण्यात आले आहे, जी भारतात आणि जगभरात लोकप्रिय आहे.

क्लासिक 650

क्लासिक 650 मध्ये 648 सीसी पॅरलल-ट्विन इंजिन आहे. ते 7250 आरपीएम वर 46.3 बीएचपी पॉवर आणि 5650 आरपीएम वर 52.3 एनएमचा पीक टॉर्क निर्माण करते. हे स्लिप-अँड-असिस्ट क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

डिझाइन

क्लासिक 650 च्या डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास, या शानदार बाईकचे डिझाइन क्लासिक 350 कडून इन्सपायर्ड आहे. यात पायलट लॅम्पसह सिग्नेचर राउंड हेडलॅम्प, टियरड्रॉप शेप इंधन टाकी, ट्रायएंगल साइड पॅनेल, मागील बाजूस गोल टेल लॅम्प असेंब्ली आहे. याशिवाय, पीशूटर-स्टाइलचा एक्झॉस्ट आहे. बाईकला सर्वत्र एलईडी लाइटिंग, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि सी-टाइप चार्जिंग पोर्ट आहे.

क्लासिक 650 चे स्पेसिफिकेशन्स

क्लासिक 650 सुपर मेटीओर/शॉटगन प्लॅटफॉर्मवर बनवली आहे. यात स्टील ट्यूबलर स्पाइन फ्रेम, सबफ्रेम आणि स्विंगआर्म वापरण्यात आले आहेत. सस्पेंशनसाठी समोर 43 मिमी टेलिस्कोपिक फोर्क सेटअप आणि मागील बाजूस ट्विन शॉक अ‍ॅब्झॉर्बर्स आहेत. दोन्ही व्हिल्सवर डिस्क ब्रेक आहेत. खास गोष्ट म्हणजे ते ड्युअल-चॅनेल ABS ने सुसज्ज आहे. तथापि, बाईकमध्ये अलॉयऐवजी फक्त चार-स्पोक व्हिल्स आहेत, ज्यामुळे ग्राहकांची (Customers) थोडी निराशा होऊ शकते. बाईकची इंधन टाकीची क्षमता 14.7 लिटर आहे. सीटची उंची 800 मिमी आहे. ग्राउंड क्लीयरन्स 154 मिमी आहे. या बाईकचे वजन 243 किलो आहे, ज्यामुळे ती आतापर्यंतची सर्वात वजनदार रॉयल एनफील्ड बनली आहे.

क्लासिक 650 ची किंमत आणि मायलेज

क्लासिक 650 च्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, ती 3.37 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरु होते. क्लासिक 650 ही 4 कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल, जे व्हॅलम रेड, ब्रंटिंगथॉर्प ब्लू, टील ग्रीन आणि ब्लॅक क्रोम आहेत. आजपासून बाईकची बुकिंग सुरु झाली असून लवकरच डिलिव्हरी सुरु होईल. बाईकचे मायलेज सुमारे 21.45 किमी प्रति लिटर असू शकते. कंपनीने याबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही.

कलर ऑप्शन

ब्रंटिंगथोर्प ब्लू: 3.37 लाख रुपये (एक्स-शोरुम)

वल्लम रेड: 3.37 लाख रुपये (एक्स-शोरुम)

टील: 3. 41 लाख रुपये (एक्स-शोरुम)

ब्लॅक क्रोम: 3.50 लाख रुपये (एक्स-शोरुम)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT