Rising repo rate will set break for automobile industry FADA Dainik Gomantak
अर्थविश्व

रेपो रेट वाढल्याने ऑटोमोबाईल उद्योग वाढीला लागणार ‘ब्रेक’: FADA

प्रवासी वाहन विभागाला दीर्घ प्रतीक्षा कालावधीमुळे रेपो दर वाढीचा फटका बसू शकतो

दैनिक गोमन्तक

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने FADA ने बुधवारी रेपो दरात झालेल्या वाढीवर आपले मत व्यक्त केले. रेपो रेटमध्ये वाढ केल्याने ऑटो उद्योग आणि दुचाकी क्षेत्राच्या वाढीला "काही प्रमाणात ब्रेक" लागेल, आधीच ऑटो उद्योगावर परिणाम होत असताना रेपो दरातील वाढीमुळे आणखी मोठी समस्या निर्माण झाली आहे. मंदीचा परिणाम होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बुधवारी रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली. या निर्णयामुळे घर, वाहनासह इतर कर्जाच्या मासिक हप्त्यांवरही परिणाम होणार म्हणत कंपनीने चिंता व्यक्त केली आहे. (Repo Rate Impact on Automobile)

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) चे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "RBI च्या रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ करण्याच्या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. या निर्णयामुळे अतिरिक्त तरलतेला आळा बसेल आणि वाहन कर्ज महाग होईल. दीर्घ प्रतीक्षा कालावधीमुळे प्रवासी वाहन विभागाला फटका बसू शकतो, परंतु दुचाकी विभाग अधिक वाहन कर्जाच्या किमतीचा आणखी एक धक्का सहन करू शकणार नाही, असे गुलाटी म्हणाले.

ग्रामीण बाजारपेठेतील खराब कामगिरी, वाहनांच्या किमतीत झालेली वाढ आणि इंधनाच्या उच्च किंमतीमुळे दुचाकी क्षेत्रावर आधीच वाईट परिणाम झाला आहे. FADA च्या मते, मार्च 2022 मध्ये दुचाकी विक्री चार टक्क्यांनी घसरून 11,57,681 युनिट्सवर आली आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात 12,06,191 युनिट्स होती.

काल आरबीआयने दर वाढवले

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काल रेपो दर 0.40 टक्क्यांनी वाढवून 4.40 टक्क्यांवर आणला आहे आणि त्यासोबतच रोख राखीव प्रमाणही 0.5 टक्क्यांनी वाढवले ​​आहे. आता सीआरआर 4.50 टक्के झाला आहे. बँकांकडून गृहकर्ज, वाहन कर्ज इत्यादींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, ज्याचा ऑटोमोबाईल उद्योगावर मोठा परिणाम होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT