500 Notes
500 Notes Dainik Gomantak
अर्थविश्व

Currency Notes: अर्थसंकल्पापूर्वी 500 रुपयाच्या नोटेबाबत RBI कडून मोठी अपडेट, तुमच्याकडेही...?

दैनिक गोमन्तक

Currency Note Latest News: केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीनंतर भारतीय चलनाबाबत अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत. तुमच्याकडेही 500 रुपयांची नोट असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 500 रुपयांच्या नोटेबाबत रिझर्व्ह बँकेने माहिती दिली आहे.

2 प्रकारच्या 500 च्या नोटा बाजारात

500 रुपयाच्या दोन प्रकारच्या नोटा बाजारात पाहायला मिळत असून दोन्ही नोटांमध्ये थोडा फरक आहे. या दोन प्रकारच्या नोटांपैकी एक नोट बनावट असल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, व्हिडीओमध्ये ही नोट बनावट असल्याचे बोलले जात आहे. चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊया...

व्हिडीओमध्ये काय म्हटले आहे?

व्हिडीओमध्ये असे म्हटले जात आहे की, 'तुम्ही 500 रुपयाची कोणतीही नोट घेऊ नका, ज्यामध्ये हिरवी पट्टी आरबीआय (RBI) गव्हर्नरच्या स्वाक्षरीतून जात असेल किंवा गांधीजींच्या फोटोच्या अगदी जवळ असेल.' या व्हिडिओमध्ये एक प्रकारची नोट बनावट असल्याचे बोलले जात आहे. पीआयबीने या व्हिडीओची सत्यता तपासली, त्यानंतर त्याचे सत्य समोर आले आहे.

दोन्ही प्रकारच्या नोटा खऱ्या आहेत

व्हिडीओची सत्यता तपासली असता हा व्हिडीओ पूर्णपणे खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे. बाजारात चालणाऱ्या दोन्ही प्रकारच्या नोटा खऱ्या आहेत. तुमच्याकडे 500 ची नोट असेल तर घाबरण्याची अजिबात गरज नाही. दोन्ही प्रकारच्या नोटा वैध असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्या

तुम्हालाही असा काही मेसेज आला तर अजिबात काळजी करु नका. असे फेक मेसेज कोणाशीही शेअर करु नका. याशिवाय, तुम्ही कोणत्याही बातमीची तथ्य तपासणी देखील करु शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल. याशिवाय, तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप नंबर +918799711259 किंवा ईमेल: pibfactcheck@gmail.com वर व्हिडिओ पाठवू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रादो 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT