RBI New Rules: करोडो बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी, RBI बदलले नियम; आता तुम्हाला...!

RBI New Rules: ज्यांची बँक खाती आहेत, त्यांच्यासाठी एक मोठी बातमी आहे. तुमचेही बँकेत खाते असेल, तर रिझर्व्ह बँकेने नियमांमध्ये मोठा बदल केला आहे.
RBI
RBI DaINIK Gomantak

RBI New Rules: ज्यांची बँक खाती आहेत, त्यांच्यासाठी एक मोठी बातमी आहे. तुमचेही बँकेत खाते असेल, तर रिझर्व्ह बँकेने नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. रिझर्व्ह बँकेकडून ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी वेळोवेळी नवनवीन नियम केले जातात. आता RBI ने बचत खात्याशी संबंधित नियम (RBI Savings Account Rules) बदलले आहेत.

बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही

भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्या खातेधारकांनी आधीच त्यांची वैध कागदपत्रे सादर केली आहेत आणि त्यांच्या पत्त्यात कोणताही बदल झालेला नाही, अशा ग्राहकांनी (Customers) त्यांचे KYC Know Your Customer (KYC) अपडेट करावे.

RBI
RBI Rule: 1 जानेवारीपासून बँकांच्या नियमांत 5 नवीन बदल

तपशील सहजरित्या अपडेट करता येणार

आरबीआयने (RBI) सांगितले की, केवायसीच्या तपशिलांमध्ये काही बदल झाल्यास खातेधारकांना त्यांचे तपशील अपडेट करावे लागतील. यासाठी, तुम्ही ईमेल आयडी, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, एटीएम आणि इतर डिजिटल पद्धतींद्वारे तपशील अपडेट करु शकता.

तपशील बदलला नाही तर काय करावे?

याशिवाय, ज्या ग्राहकांचे केवायसी तपशील बदललेले नाहीत, अशा ग्राहकांना त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी स्वतःकडून घोषणापत्र द्यावे लागेल. यासाठी शाखेत जाण्याची गरज नाही.

RBI
Home Loan: RBI च्या व्याजदरवाढीनंतर महागलेल्या गृह कर्जापासून वाचवतील 'हे' 4 उपाय

ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळतात

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बँकांना सांगितले की, हे निर्णय ग्राहकांच्या सुविधा लक्षात घेऊन घेतले जातात, जेणेकरुन ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहतील. तसेच त्यांचे तपशील अपडेट केले जावेत जेणेकरुन कोणालाही कोणतीही अडचण येऊ नये. यासोबतच देशभरात बँकांच्या नावाने अनेक प्रकारची फसवणूक केली जात असून, याला रोखण्यासाठी आरबीआयकडून मोहीम राबविण्यात येत आहे.

RBI
RBI: नागरी सहकारी बँकांबाबत रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

तपशील शेअर करु नका

रिझर्व्ह बँकेने म्हटले की, देशातील कोणत्याही बँकेतून किंवा आरबीआयकडून कोणत्याही ग्राहकाला कॉल केला जात नाही. यासोबतच कोणत्याही ग्राहकाकडून वैयक्तिक माहिती विचारली जात नाही. त्यामुळे अशा फोन कॉल्सवर तुमची कोणतीही माहिती शेअर करु नका.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com