रेनॉल्ट ट्रायबर ही देशातील सर्वात परवडणारी ७-सीटर कार म्हणून ओळखली जाते आणि आता ही कार नवीन फेसलिफ्ट अवतारात सादर होणार आहे. २०१९ मध्ये पहिल्यांदा लाँच झालेल्या ट्रायबरमध्ये रेनॉल्ट कंपनीने पहिल्यांदाच मोठे अपडेट्स दिले असून, हे अपडेट्स केवळ बाह्यरचनेत नव्हे तर आतील वैशिष्ट्यांमध्येही दिसून येणार आहेत.
विशेष म्हणजे, या कारच्या किमती ६.१५ लाख रुपयांपासून सुरू होऊन ८.९८ लाख रुपयांपर्यंत जातात आणि फेसलिफ्ट व्हर्जनची किंमत देखील याच दरम्यान असण्याची शक्यता आहे.फेसलिफ्ट ट्रायबरमध्ये सुधारित हेडलॅम्प क्लस्टर, एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आणि नवीन आयब्रॉ डिझाईन देण्यात आले आहे.
फ्रंट ग्रिलमध्ये देखील मोठा मेकओव्हर करण्यात आला असून, मागील प्रोफाइलमध्येही बदल दिसून येणार आहेत.
ट्रायबर फेसलिफ्टच्या डॅशबोर्डमध्ये हलक्या रंगांचे आणि सॉफ्ट-टच मटेरियलसह आधुनिक लुक दिला जाणार आहे. यासोबतच, अनेक नवे फीचर्स आणि फंक्शन्स यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. तिसऱ्या रांगेतील सीटसाठी हेडरेस्टचा समावेश केला असून, त्यामुळे प्रवास अधिक आरामदायक होणार आहे.
ही कार सध्या 1.0 लिटर नॅचरली एस्पिरेटेड, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह येते, जे 72 bhp ची कमाल पॉवर आणि 96 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. यासोबतच, कंपनीने काही काळापूर्वी ट्रायबरचे CNG व्हर्जनही बाजारात आणले होते.
भारतीय ग्राहक बजेटनुसार अधिक जागा आणि फीचर्स असलेल्या गाड्या निवडतात. अशा वेळी मारुती स्विफ्ट, ह्युंदाई आय२०, टिगोर, डिझायर यांच्याशी स्पर्धा करणाऱ्या ट्रायबर फेसलिफ्टला एक जबरदस्त पर्याय मानले जात आहे. ही कार केवळ किमतीतच नाही तर जागेत, उपयोगात आणि डिझाईनमध्येही आकर्षक ठरत आहे.
रेनॉल्ट ट्रायबर फेसलिफ्ट ही येत्या काही महिन्यांत अधिकृतपणे लाँच होण्याची शक्यता असून, फॅमिली कारच्या शोधात असणाऱ्यांसाठी ती एक परवडणारी आणि स्मार्ट निवड ठरू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.