Reliance 5G Dainik Gomantak
अर्थविश्व

Jio 5G: रिलायन्सच्या 5G नेटवर्कबाबत मुकेश अंबानी यांनी केली महत्वपूर्ण घोषणा

गोमन्तक डिजिटल टीम

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी (Reliance Chairman Mukesh Ambani) यांनी भारतासाठी पुढील 25 वर्षे अमृतकाळ असे वर्णन केले आहे. रिलायन्स भारताच्या प्रगतीत मोठी भूमिका बजावणार आहे. नुकतेच रिलायन्स इंडस्ट्रीजची 45 वी एजीएम (Reliance AGM 2022) पार पडली. यावेळी मुकेश अंबानी यांनी काही महत्वपूर्ण गोष्टींचा उल्लेख केला. तसेच, लवकरच रिलायन्सच्या 5G नेटवर्कबाबत देखील माहिती दिली.

मुकेश अंबानी म्हणाले, जगातील अनेक देश प्रचंड महागाई आणि आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. रिलायन्स दिवाळीपर्यंत देशभरात Jio 5G नेटवर्क लॉन्च करेल असे त्यांनी सांगितले. यासाठी जिओ ₹ 2,00,000 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. भारत सरकारने ज्या पद्धतीने कोरोना संसर्गाचा सामना केला आणि त्यानंतर उद्भवलेली परिस्थिती प्रशंसनीय असल्याचे मुकेश अंबानी म्हणाले.

यावर्षी दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या महानगरांमध्ये 5G सेवा सुरू होईल. डिसेंबर 2023 पर्यंत देशातील प्रत्येक शहरात 5G सेवा सुरू होईल. Jio ची 5G सेवा संपूर्ण देशात जगातील सर्वात जलद पोहोचू शकेल. असे अंबानी म्हणाले.

रिलायन्सच्या एजीएममध्ये मुकेश अंबानी म्हणाले, गेल्या वर्षभरात जिओने डेटा वापर दुप्पट केला आहे. देशात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली अनेक योजनांचे लाभ सामान्य लोकांपर्यंत पोहोचले आहेत, नेटवर्क प्रदाता म्हणून जिओने यामध्ये मोठी भूमिका बजावली आहे. असे अंबानी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

Goa News Live: अन्वर शेख हत्या प्रकरण; सर्व संशयितांची निर्दोष सुटका

Cooch Behar Trophy: गोव्याचा युवा संघ सुस्तावला, कुचबिहार क्रिकेट सामन्यात चंडीगड आघाडीच्या दिशेने

Viral Video: रेल्वे ट्रॅकवर फसली 'थार'; नागालँडच्या राजधानीतला व्हिडिओ व्हायरल Watch

SCROLL FOR NEXT