उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये मोठा डाव खेळण्याच्या तयारीत आहे. कंपनी या क्षेत्रात लाखो कोटींची गुंतवणूक करणार आहे, ज्यामुळे 10 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे.
गुजरात सरकारसोबत सामंजस्य करार
रिलायन्स इंडस्ट्रीजने गुरुवारी गुजरात सरकारसोबत सामंजस्य करार केला. व्हायब्रंट गुजरात सम्मेलन 2022 (Vibrant Gujrat Summit 2022) साठी प्रचारात्मक क्रियाकलाप म्हणून या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. त्यानुसार कंपनी राज्यातील हरित ऊर्जा आणि इतर प्रकल्पांमध्ये एकूण 5.95 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
गुजरात कार्बन मुक्त राज्य बनेल
रिलायन्सने सांगितले की ते 100 GW अक्षय ऊर्जा ऊर्जा प्रकल्प आणि ग्रीन हायड्रोजन इको-सिस्टम विकसित करण्यासाठी पुढील 10 ते 15 वर्षांत 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. यामुळे गुजरात कार्बनमुक्त राज्य बनण्यास मदत होईल.
याशिवाय, रिलायन्स लघु आणि मध्यम उद्योगांना (SMEs) मदत करण्यासाठी एक इको-सिस्टम देखील तयार करणार आहे. त्यामुळे त्यांना नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यास मदत होईल. याशिवाय, कंपनी सौर सेल, इलेक्ट्रोलायझर, बॅटरी इत्यादींच्या निर्मिती प्रकल्पांमध्ये 60,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल आणि तिच्या विद्यमान प्रकल्पांवर 25,000 कोटी रुपये, जिओच्या (Jio Network) अपग्रेडेशनवर 7,500 कोटी रुपये पुढील 3 ते 5 वर्षांत गुंतवणार असल्याची माहिती आहे.
10 लाख रोजगार निर्माण होतील
या गुंतवणुकीमुळे राज्यात 10 लाखांहून अधिक लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.