Mukesh Ambani & Gautam Adani Dainik Gomantak
अर्थविश्व

Forbes' Global 2000 List: फोर्ब्सची नवी यादी जाहीर, रिलायन्सची गरुडझेप; अदानींच्या कंपन्यांचीही ग्रॅंड एन्ट्री!

Manish Jadhav

Forbes' Global 2000 List: रिलायन्सने पुन्हा एकदा एक मोठा टप्पा गाठला आहे. फोर्ब्सच्या नव्या जागतिक यादीत रिलायन्सला 8 अंकाचा फायदा झाला आहे.

अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने फोर्ब्सच्या ताज्या 'ग्लोबल 2000' यादीत आठ स्थानांनी 45 व्या स्थानावर झेप घेतली आहे. या यादीतील कोणत्याही भारतीय कंपनीच्या तुलनेत हे सर्वोच्च स्थान आहे.

2000 कंपन्यांची यादी जाहीर

दरम्यान, 2023 साठी जगातील शीर्ष 2,000 कंपन्यांची यादी जाहीर करताना, फोर्ब्सने सांगितले की, विक्री, नफा, मालमत्ता आणि बाजार मूल्यांकन या चार घटकांच्या आधारे ही यादी तयार करण्यात आली आहे. अमेरिकेतील (America) सर्वात मोठी बँक JPMorgan (JPMorgan) 2011 नंतर प्रथमच या यादीत अव्वल स्थानावर आहे. बँकेची एकूण मालमत्ता 3700 अब्ज डॉलर्स आहे.

वॉरन बफेचा बर्कशायर हॅथवेची घसरण

वॉरेन बफे यांचा बर्कशायर हॅथवे, जो गेल्या वर्षी या यादीत अव्वल होता, तो या वर्षी त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमधील तोट्यामुळे 338 व्या स्थानावर घसरला आहे. सौदीची तेल कंपनी अराम्को दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर तीन महाकाय सरकारी बँका आहेत. तंत्रज्ञान कंपनी अल्फाबेट आणि अॅपल 7 व्या आणि 10 व्या स्थानावर आहेत.

रिलायन्स 45 व्या स्थानावर आहे

रिलायन्स इंडस्ट्रीज US$109.43 अब्ज विक्री आणि US$8.3 अब्ज नफ्यासह 45 व्या स्थानावर आहे. समूहाचा व्यवसाय तेलापासून दूरसंचारापर्यंत पसरलेला आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज जर्मनीचा बीएमडब्ल्यू ग्रुप, स्वित्झर्लंडचा नेस्ले, चीनचा अलिबाबा ग्रुप, अमेरिकन प्रॉक्टर अँड गॅम्बल आणि जपानचा सोनी यांच्या पुढे आहे.

कोणती कंपनी कोणत्या नंबरवर आहे?

या यादीत स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 77 व्या (2022 मध्ये 105 वे), HDFC बँक 128 व्या (2022 मध्ये 153 वा) आणि ICICI बँक (ICICI Bank) 163 व्या (2022 मध्ये 204 व्या) स्थानावर आहे. इतर कंपन्यांमध्ये ओएनजीसी 226 व्या, एलआयसी 363 व्या, टीसीएस 387 व्या, अॅक्सिस बँक 423 व्या, एनटीपीसी 433 व्या, लार्सन अँड टुब्रो 449 व्या, भारती एअरटेल 478 व्या, कोटक महिंद्रा बँक 502 व्या, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन 540 व्या, इन्फोसिस बँक 554 व्या, बॅक ऑफ बडोदा 586 व्या क्रमांकावर आहे.

या यादीत 55 भारतीय कंपन्यांचा समावेश आहे

या यादीत एकूण 55 भारतीय कंपन्यांचा समावेश आहे. या यादीत अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या समूहातील अदानी एंटरप्रायझेस (1062 वे स्थान), अदानी पॉवर (1488 वे स्थान) आणि अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (1598 वे स्थान) या तीन कंपन्यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT