Realme C53 Dainik Gomantak
अर्थविश्व

Realme C53: 9,999 रुपयांमध्ये 108MP कॅमेरा असलेला फोन, 5,000mAh बॅटरीसह ही दमदार वैशिष्ट्ये...

Realme C53 मध्ये 108-मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा आहे. फोनमध्ये 90Hz डिस्प्ले आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज देखील मिळते.

Ashutosh Masgaunde

स्मार्टफोन ब्रँड Realme ने बुधवारी भारतात आपला नवीन फोन Realme C53 हा फोन लॉन्च केला आहे.

हा बजेट स्मार्टफोन 108-मेगापिक्सेल प्राइमरी रियर कॅमेरासह येतो, जो या सेगमेंटमधील पहिला फोन आहे.

फोनमध्ये 90Hz डिस्प्ले आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज देखील आहे. Realme C53 भारतात 10 हजारांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध करण्यात आला आहे.

तसेच कंपनी सुरुवातीच्या काही ग्राहकांना फोनच्या किंमतीमध्ये 1000 रुपयांची सुट देणार आहे.

Realme C53 किंमत

हा Realme फोन भारतात 9,999 रुपयांपासून उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा फोन 26 जुलैपासून Realme वेबसाइट, Flipkart आणि इतर रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येईल.

या फोनच्या Flipkart वर नमूद केलेल्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, हा कंपनीचा पहिला C सीरीज स्मार्टफोन असेल जो 108MP मुख्य कॅमेरा सह येईल.

Realme C53 चे स्पेसिफिकेशन

Realme च्या स्वस्त फोनमध्ये 6.74 इंचाचा HD Plus IPS LCD डिस्प्ले आहे. डिस्प्लेसह 90 Hz रिफ्रेश टाइम उपलब्ध आहे.

फोनमध्ये Octa Core Unisoc T612 प्रोसेसरसह 128 GB स्टोरेजचा सपोर्ट आहे.

फोनसोबत 108-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा उपलब्ध आहे, जो या सेगमेंटमधील पहिला फोन आहे.

फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Realme C53 Battery

Realme च्या मते, 19 जुलै रोजी भारतात संध्याकाळी 6 ते रात्री 8 च्या दरम्यान 'Realme C53' चा अर्ली बर्ड सेल होईल.

कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त, हा डिवाइस फ्लिपकार्टवर देखील विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल.

कंपनी या फोनच्या सुरुवातीच्या खरेदीदारांना 6GB + 64GB व्हेरिएंटवर 1000 रुपयांची सूट देखील मिळणार आहे. ICICI, HDFC आणि SBI बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डवर EMI पर्यायांसह बँक ऑफर देखील उपलब्ध आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT