RBI will approve 2 new banks named Cosmea Financial & Tally Solutions Dainik Gomantak
अर्थविश्व

देशात आणखी 2 नव्या खाजगी बँकांची स्थापना

रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) या कंपन्यांना परवाने दिल्यानंतर या कंपन्या बँका म्हणून काम करण्यास सुरुवात करणार आहेत.

दैनिक गोमन्तक

देशात आता आणखीन दोन नवीन बँका (Bank) येणार आहेत. आगामी काळात 2 नवीन कंपन्या लघु वित्त बँका (Small Financial Bank) म्हणून काम करणार असल्याची माहिती मिळत आहे . दोन वित्तीय कंपन्यांनी बँका म्हणून परवाना घेण्यासाठी केंद्रीय बँक RBI कडे अर्ज केला आहे. रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) या कंपन्यांना परवाने दिल्यानंतर या कंपन्या बँका म्हणून काम करण्यास सुरुवात करणार आहेत.(RBI will approve 2 new banks named Cosmea Financial & Tally Solutions)

RBI press release

आरबीआयने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, ज्या दोन वित्तीय कंपन्यांनी आरबीआयकडे बँक परवान्यासाठी अर्ज केला आहे ते कॉस्मिया फायनान्शियल होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड आणि टॅली सोल्युशन्स होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या आहेत.

Cosmea Financial Holdings Private Limited

कॉस्मिया फायनान्शियल होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड ही एक खाजगी कंपनी असून ती 24 नोव्हेंबर 2020 रोजी सुरू करण्यात आली आहे. रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, मुंबई यांच्याकडे केलेल्या नोंदणीनुसार या कंपनीचे वर्गीकरण गैरसरकारी कंपनी म्हणून करण्यात आले आहे. कंपनी सध्या विमा आणि पेन्शन निधी वगळता आर्थिक मध्यस्थीसाठी सहायक उपक्रमांमध्ये सामील आहे. सौमेन घोष आणि सुरेश तिरुअनंतपुरम विश्वनाथन हे कॉस्मिया फायनान्शियल होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक आहेत.

Tally Solutions Private Limited

टॅली सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही एक खाजगी कंपनी आहे जी 8 नोव्हेंबर 1991 रोजी समाविष्ट झालेली आहे. रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, बेंगलोर यांच्याकडे केलेल्या नोंदणीनुसार, ती एक गैर-सरकारी कंपनी म्हणून वर्गीकृत आहे. ही कंपनी प्रामुख्याने सॉफ्टवेअर प्रकाशन, सल्लागार आणि पुरवठा क्षेत्रात आहे. आणि आता ही कंपनी वित्तीय सेवा / बँकिंगमध्ये हात आजमावणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॅटरीचा राजा येतोय! Redmi 15 5G लाँचिंगसाठी सज्ज, 7000mAh बॅटरी करणार कमाल; जाणून घ्या अफलातून फीचर्स

IND vs ENG: भारतासाठी ओव्हल 'लकी' की 'अनलकी'? कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? गिल सेना करणार मोठा चमत्कार

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Lung Cancer: फुफ्फुसाच्या कर्करोगाचा तरुणाईला विळखा, 50 वर्षांखालील 21 टक्के लोकांना जखडलं; जाणून घ्या का वाढतोय धोका?

Goa Assembly: गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात वाढ, जून 2025 पर्यंत 54.5 लाख पर्यटकांची नोंद, मंत्री रोहन खंवटेंची माहिती; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT