Property Dainik Gomantak
अर्थविश्व

RBI New Rule: 1 डिसेंबरपासून लागू होणार प्रॉपर्टी पेपर्स संबंधी नियम, RBI ने दिले आदेश!

Reserve Bank of India New Rule: तुम्ही कोणत्याही बँक किंवा NBFC कडून गृहकर्ज घेतले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Manish Jadhav

Reserve Bank of India New Rule: तुम्ही कोणत्याही बँक किंवा NBFC कडून गृहकर्ज घेतले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. होय, आरबीआयच्या आदेशानंतर 1 डिसेंबरपासून प्रॉपर्टी लोनशी संबंधित नवीन नियम लागू होणार आहेत.

या नियमानुसार, जर तुम्ही प्रॉपर्टीवर कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले असेल, तर संपत्तीची कागदपत्रे पूर्ण परतफेडीच्या (Loan Repayment) 30 दिवसांच्या आत ग्राहकाला परत करावी लागतील. बँकेने तसे न केल्यास ग्राहकाला प्रतिदिन 5000 रुपये दंड द्यावा लागेल.

प्रॉपर्टीची कागदपत्रे गहाळ झाल्याचीही प्रकरणे

ग्राहकांच्या (Customers) तक्रारी आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने हा नियम जारी केला आहे. आरबीआयकडे अशा अनेक तक्रारी आल्या ज्यात कर्जफेडीनंतर ग्राहकांना प्रॉपर्टीच्या कागदपत्रांसाठी अनेक महिने फेऱ्या माराव्या लागल्या.

काही प्रकरणांमध्ये प्रॉपर्टीची कागदपत्रे गहाळ झाल्याचेही बँकेने सांगितले. बँकेचे असे दुर्लक्ष पाहता रिझर्व्ह बँकेने हा आदेश जारी केला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती गृहकर्ज किंवा कोणत्याही प्रकारचे प्रॉपर्टी लोन घेते तेव्हा बँक त्या प्रॉपर्टीची मूळ कागदपत्रे स्वतःकडे ठेवते.

30 दिवसांच्या आत कागदपत्रे परत करावी लागतील

ग्राहकाने कर्जाची परतफेड केल्यानंतर मूळ कागदपत्रे बँकेला परत करावी लागतात. मात्र बँकांच्या निष्काळजीपणाची प्रकरणे समोर आल्यानंतर आरबीआयने हा नियम जारी केला आहे. हा नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

आरबीआयने (RBI) बँका आणि एनबीएफसींना जारी केलेल्या परिपत्रकात कर्जाची पूर्ण परतफेड केल्याच्या 30 दिवसांच्या आत सर्व कागदपत्रे द्यावी लागतील, असे म्हटले होते. बँक किंवा NBFC द्वारे 30 दिवसांनंतर कागदपत्रे जारी केल्यास बँकेला दंड भरावा लागेल.

दुसरीकडे, कागदपत्रे परत करण्यास उशीर झाल्यास बँक किंवा एनबीएफसीला प्रतिदिन 5 हजार रुपये दंड आकारला जाईल, असे आदेशात म्हटले आहे. दंडाची रक्कम बँक संबंधित मालमत्ताधारकाला देईल.

आरबीआयने अधिसूचनेत असेही म्हटले आहे की, कर्जदाराच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे हरवल्यास, बँकेला कागदपत्रांच्या डुप्लिकेट प्रती मिळवण्यासाठी ग्राहकाला मदत करावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT