RBI New FD Rules Dainik Gomantak
अर्थविश्व

RBI New FD Rules: 1 ऑक्टोबरपासून बदलणार एफडीचे नियम! सर्व बँकांसाठी आरबीआयचा 'मास्टरस्ट्रोक'; तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम?

RBI New FD Rules October 1 2026: आपली कष्टाची कमाई सुरक्षित ठेवून त्यावर निश्चित परतावा मिळवण्यासाठी बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट (FD) करणाऱ्या लाखो ग्राहकांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला.

Manish Jadhav

RBI New FD Rules October 1 2026: आपली कष्टाची कमाई सुरक्षित ठेवून त्यावर निश्चित परतावा मिळवण्यासाठी बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट (FD) करणाऱ्या लाखो ग्राहकांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला. रिझर्व्ह बँकेने एफडी आणि बल्क डिपॉझिट्सशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला असून हा नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून देशभरात लागू होणार आहे.

ग्राहकांना मिळणाऱ्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता आणणे आणि एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये होणारा भेदभाव पूर्णपणे रोखणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. या नवीन दुरुस्तीनुसार देशातील सर्व कमर्शियल बँका, स्मॉल फायनान्स बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँकांना या नियमांचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे.

नवीन नियमांनुसार आता एकाच बँकेच्या (Bank) वेगवेगळ्या शाखांमध्ये समान रकमेच्या आणि समान कालावधीच्या एफडीवर वेगवेगळे व्याजदर देता येणार नाहीत. उदाहरणार्थ, जर एकाच दिवशी एखाद्या बँकेच्या मुंबई शाखेत आणि नागपूर शाखेत समान मुदतीची एफडी केली, तर दोन्ही ग्राहकांना अगदी एकसारखाच व्याजदर द्यावा लागेल. यामुळे कोणत्याही शाखेत ग्राहकांसोबत भेदभाव होण्याचा मार्ग आता बंद झाला आहे.

याशिवाय, ग्राहकांना योग्य निर्णय घेता यावा यासाठी बँकांना त्यांचे एफडी दर आधीच जाहीर करावे लागतील. 3 कोटी रुपये किंवा त्याहून अधिकच्या बल्क एफडीसाठी बँकांना दररोज सकाळी 10 वाजेपर्यंत आपल्या अधिकृत वेबसाइटवर नवीन व्याजदर प्रसिद्ध करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

मोठ्या ठेवी म्हणजेच बल्क डिपॉझिट्सच्या बाबतीत रिझर्व्ह बँकेने बँकांना त्यांच्या लिक्विडिटी कव्हरेज रेशिओनुसार व्याजदर निश्चित करण्याची थोडी सवलत दिली. हा नियम अनिवासी भारतीयांच्या खात्यांनाही लागू होणार आहे. पूर्वी काही विशेष किंवा मोठ्या ग्राहकांना बँक स्तरावर वेगळा जास्त व्याजदर दिला जायचा, तो प्रकार आता पूर्णपणे थांबणार आहे. आता ग्रामीण भाग असो वा मोठे शहर, जर बँक एकच असेल तर मिळणारा व्याजदरही एकच राहील. यामुळे सामान्य नागरिकांना घरात बसूनच वेबसाइटवर आजचे व्याजदर तपासून एफडी करण्याचा मोठा फायदा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT