Market Trading Timing Dainik Gomantak
अर्थविश्व

Market Trading Timing: 18 एप्रिलपासून आरबीआय रेग्युलेटेड मार्केटच्या वेळेत बदल

महामारीच्या काळात शेअर मार्केटची सुरुवात सकाळी 10 वाजता होण्यास सुरुवात होत होती पण आता 18 एप्रिलपासून या वेळेत पुन्हा एकदा बदल होणार आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव कमी झाल्याने भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने रेग्युलेटेड मार्केटमध्ये बदल करण्याचा निर्यय घेतला आहे. या निर्णयामध्ये 18 एप्रिलपासून आता बाजार सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे. आरबीआयने याबाबत एका निवेदनात म्हटलं आहे, "कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आता कमी झाला असून इतर व्यवहारही सामान्य झाले आहेत. त्यामुळे वित्तीय बाजारातील व्यवहार सकाळी 9 वाजता सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."

* वेळेमध्ये केलेले बदल: आता सकाळी 9 ते 3.30 पर्यंत व्यवहार चालतील

गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना विषाणुचा (Corona Virus) प्रादुर्भाव लक्षात घेता बाजाराची सुरुवात ही सकाळी 10 वाजता करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी दिसून येत आहे. त्यामुळे इतर व्यवहारही सर्वसामान्य झाले आहेत. त्यामुळे आता 18 एप्रिलपासून बाजारातील व्यवहार हा पुन्हा एकदा सकाळीच 9 वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे. हा व्यवहार दुपारी 3.30 पर्यंत सुरू राहणार आहे. बदल करण्यात आलेल्या या वेळेमुळे आता परकीय चलन विनिमय बाजार आणि सरकारी प्रतिभूतींच्या देवाण-घेवाणीचा व्यवहार देखील सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे. आरबीआयचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी नवीन पतधोरण जाहीर केल्यनंतर हा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी आपले पतधोरण जाहीर केले आहे. यंदा अपेक्षेनुसार व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पतधोरणात रेपो दरामध्ये कोणताही बदल न करता तो 4 टक्के इतका कायम ठेवण्यात आला असून रिर्व्हस रेपो रेट 3.75 टक्के इतका ठेवण्यात आला आहे. सलग अकराव्यांदा व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT