RBI  Dainik Gomantak
अर्थविश्व

RBI Repo Rate: RBI सप्टेंबरमध्ये पुन्हा वाढणार रेपो रेट!

RBI Repo Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ची चलनविषयक धोरण समिती (Monetary Policy) पॉलिसी दर वाढीचा वेग कमी करु शकते.

दैनिक गोमन्तक

RBI Repo Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ची चलनविषयक धोरण समिती (Monetary Policy) पॉलिसी रेट वाढीचा वेग कमी करु शकते, असे मत डॉइश बँकेच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे. रिझव्‍‌र्ह बँक (RBI) सप्टेंबरच्या चलनविषयक आढाव्यात रेपो रेट एक चतुर्थांश टक्क्यांनी वाढवू शकते, असा अंदाज डॉइश बँकेने वर्तवला आहे. केंद्रीय बँकेने या वर्षी मे ते ऑगस्टपर्यंत रेपो दरात 1.40 टक्क्यांनी वाढ केली आहे. चलनवाढ रिझर्व्ह बँकेच्या 6 टक्क्यांच्या समाधानकारक पातळीपेक्षा वरच राहिली आहे, याच पार्श्वभूमीवर मध्यवर्ती बँकेने तीन टप्प्यांत रेपो रेट 1.40 टक्क्यांपर्यंत वाढवला ​​आहे.

RBI सप्टेंबरनंतर व्याजदर कमी करणार!

बँक ऑफ जर्मनीने एका अहवालात म्हटले आहे की, 'येथून रिझर्व्ह बँक (Reserve Bank) व्याजदर वाढीचा वेग कमी करेल. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आरबीआयने रेपो दरात 50 बेसिस पॉईंट वाढीची घोषणा केली होती. या वाढीसह, मध्यवर्ती बँकेने रेपो दर आधीच्या रेपो दरावरुन 5.40 टक्के म्हणजेच कोरोना महामारीपूर्वी 5.5 टक्के केला आहे.'

अर्थव्यवस्था वेगाने वाढेल

रेपो दरात (Repo Rate) वाढ करण्याची घोषणा करताना, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) म्हणाले होते की, 'भारतीय अर्थव्यवस्था महागाईशी झुंज देत आहे. त्यामुळे ती तात्काळ नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. यातच आता चलनविषयक समीतीनेही चलनवाढ रोखण्यासाठी लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.' दास पुढे असेही म्हणाले की, 'जागतिक स्तरावरील अनेक संघटनांनी आपल्या अर्थव्यवस्थेच्या वेगवान वाढीचा अंदाज वर्तवला आहे.'

रेपो रेट म्हणजे काय?

रेपो रेट म्हणजे, ज्यावर RBI द्वारे बँकेला कर्ज दिले जाते आणि त्या आधारावर बँका ग्राहकांना कर्ज देतात, तर रिव्हर्स रेपो रेट म्हणजे, ज्यावर RBI त्यांना बँकांकडून ठेवींवर कर्ज देते. अशा परिस्थितीत जेव्हा आरबीआय रेपो रेट वाढवते तेव्हा बँकांवर बोजा वाढतो आणि बँकेच्या वतीने बँक दरात कर्ज महाग होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बागातील 'त्या' प्रकाराबाबत उत्कंठा वाढली! क्राईम ब्रँचकडून गुन्ह्याची नोंद; व्हिडिओतील टोळक्यापर्यंत पोलिस पोहोचले

VIDEO: "नुसते फटके मारुन चालत नाही!" बाबर आझमचा 'स्लो' खेळ अन् 'फास्ट' उत्तर; सोशल मीडियावर फुटले वादाला तोंड

Bihar Food Poisoning: सत्यनारायणाचा प्रसाद ठरला जीवघेणा! मुजफ्फरपूरमध्ये 100 हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा; एकाच वेळी अख्खं गाव पडलं आजारी

IPL 2026 Points Table : राजस्थानला नमवून SRH चा गुणतालिकेत धमाका! मोठ्या उलटफेरासह टॉप-5 मध्ये एन्ट्री; मुंबई, चेन्नई आणि कोलकाताची अवस्था बिकट

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

SCROLL FOR NEXT