Reserve Bank (RBI) Governor Shaktikanta Das Dainik Gomantak
अर्थविश्व

Reserve Bank Of India : रिझर्व्ह बँकेने जाहीर केली 'ही' महत्त्वाची यादी, जाणून घ्या नाहीतर...

India's Safest Bank: आरबीआयने एक यादी जाहीर केली असून, तुमचे पैसे कोणत्या बँकेत सुरक्षित आहेत आणि कोणत्या बँकेत तुमचे पैसे सुरक्षित नाहीत, हे सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

RBI Bank: भारतात अनेक बँका आहेत, ज्यात करोडो ग्राहकांची खाती आहेत. यात सरकारी ते खासगी बँकांपर्यंत मोठी यादी आहे, मात्र आता रिझर्व्ह बँकेकडून बँकांबाबत बरीच माहिती देण्यात आली आहे. आरबीआयने एक यादी जाहीर केली असून, तुमचे पैसे कोणत्या बँकेत सुरक्षित आहेत आणि कोणत्या बँकेत तुमचे पैसे सुरक्षित नाहीत, हे सांगितले आहे.

1 सरकारी आणि 2 खाजगी बँकांची नावे समाविष्ट आहेत

रिझर्व्ह बँकेने महत्त्वाच्या बँकांची (D-SIBs) 2022 ची यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये एक सरकारी आणि दोन खाजगी बँकांची नावे आहेत. यासोबतच गतवर्षी समाविष्ट बँकांचीही नावे आहेत.

एसबीआयसह या बँकांचा समावेश आहे

RBI ने दिलेल्या माहितीनुसार, 2022 च्या या यादीत स्टेट बँक ऑफ इंडिया व्यतिरिक्त खाजगी क्षेत्रातील HDFC बँक आणि ICICI बँकेची (ICICI Bank) नावे समाविष्ट आहेत. या यादीत अशा बँकांची नावे आहेत, ज्यांच्या नुकसानीचा परिणाम देशभरातील आर्थिक व्यवस्थेवर होईल.

बँकांवर करडी नजर ठेवण्यात आली

या यादीत येणाऱ्या बँकांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. RBI च्या यादीनुसार, SBI च्या जोखीम भारित मालमत्तेपैकी 0.60 टक्के टियर-1 म्हणून ठेवण्यात आले आहेत. त्याचवेळी, ICICI आणि HDFC ची जोखीम भारित मालमत्ता 0.20 टक्के आहे.

ही यादी 2015 पासून प्रसिद्ध होत आहे

2015 पासून, रिझर्व्ह बँक अशा बँकांची यादी जारी करते, ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सर्वात महत्वाच्या आहेत. यामध्यमातून RBI त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवते. बँकांना आरबीआयकडून रेटिंगही दिले जाते, त्यानंतरच या महत्त्वाच्या बँकांची यादी तयार केली जाते. सध्या या यादीत 3 बँकांची नावे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NSA In Goa: गुन्हेगारी कृत्यांवर वचक ठेवण्यासाठी गोवा सरकारने उचलले मोठे पाऊल, राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

Goa Today's News Live: 8.50 कोटी रुपयांची थकबाकी; मुरगाव पालिकेची इंडियन ऑईला कारणे दाखवा नोटीस

Goa Politics: खरी कुजबुज; युतीचा आवेश संपला का?

बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाने गाठले, परदेशातून लग्नासाठी गोव्यात आलेल्या ‘लिओ’चा अपघाती मृत्यू

VIDEO: "वेळीच सुधारणा केली नाही तर..." चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी गौतमचा शुभमन गिलला 'गंभीर' इशारा! सरावादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT