लोकांना अॅपवरुन झटपट कर्ज देणाऱ्या कंपन्यांवर बडी येणार आहे. कारण आरबीआय येत्या दोन महिन्यांत डिजिटल कर्जासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी माहिती दिली आहे. गेल्या काही वर्षांत झटपट कर्ज देणाऱ्या कंपन्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या कंपन्या लोकांना लगेच कर्ज देतात आणि नंतर त्यांच्याकडून लोकांना वाईट वागणूक दिली जाते.
आरबीआय (RBI) एक ते दोन महिन्यांत मार्गदर्शक तत्त्वे जारी केले जातील. मध्यवर्ती बँकेकडे लोकांच्या डिजिटल कर्ज देणारे अॅप्स आणि प्लॅटफॉर्मला बळी पडत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी आम्हाला तक्रारी मिळाल्या आहेत. आम्ही अशा प्रकरणांची चौकशी करत आहोत असं आरबीआयच्या गव्हर्नर सांगितले आहे. या कंपन्या अॅपद्वारे लोकांना लगेच कर्ज देतात. त्यांचा व्याजदर खूप जास्त असतो आणि लोकांकडून पैसे वसूल करतांना खूप त्रास दिला जातो. यामुळे अनेक लोकांनी आत्महत्या देखील केल्या आहेत.
व्हेरिफाईड फिनटेक याच कंपन्यांना कर्ज देण्याची परवानगी दिली पाहिजे. सर्व फिनटेक कंपन्यांनी, ज्यामध्ये आता बाय-अँड-पे-लेटर (BNPL),आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांखाली येणे आवश्यक आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून बनावट प्लॅटफॉर्म आणि अॅप्सवर बंदी घातली जाईल. मार्गदर्शक तत्त्वे कॅपिटल फ्लोट, स्लाइस, झेस्टमनी, पेटीएम, भारतपे आणि यूएनआय सारख्या BNPL यासारख्यांना कंपण्यांना देखील लागू होतील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.