Reserve Bank (RBI) Governor Shaktikanta Das Dainik Gomantak
अर्थविश्व

RBI ने सहकारी बँकांसाठी लागू केला नवा नियम, ग्राहकांना मिळणार फायदा

Reserve Bank of India: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने नागरी सहकारी बँकांसाठी बुलेट रिपेमेंट योजनेतर्गंत सोन्यावरील कर्ज (गोल्ड लोन) दुप्पट करुन 4 लाख रुपये केले आहे.

Manish Jadhav

Reserve Bank of India: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने नागरी सहकारी बँकांसाठी बुलेट रिपेमेंट योजनेतर्गंत सोन्यावरील कर्ज (गोल्ड लोन) दुप्पट करुन 4 लाख रुपये केले आहे. ही मर्यादा त्या नागरी सहकारी बँकांसाठी वाढवण्यात आली आहे, ज्यांनी 31 मार्च 2023 पर्यंत प्राधान्य क्षेत्रातील लोनतर्गंत सर्व उद्दिष्टे पूर्ण केली आहेत.

आरबीआयने बँकांना दिलेल्या या सवलतीचा लाभ नागरी सहकारी बँकांमध्ये खाती असलेल्या आणि गरजेनुसार गोल्ड लोन घेतलेल्या ग्राहकांना मिळणार आहे.

मूळ रक्कम आणि व्याज एकत्र भरणे

द्वि-मासिक पतधोरण आढाव्याची घोषणा करताना, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, 'अर्बन को-ऑपरेटिव्ह बँका (UCBs) ज्यांनी 31 मार्च 2023 पर्यंत प्राधान्य क्षेत्र कर्ज (PSL) अंतर्गत एकूण लक्ष्यापर्यंतचे उप-लक्ष्य पूर्ण केले आहे.

अशा बँकांसाठी, बुलेट परतफेड योजनेंतर्गत गोल्ड लोनची सध्याची मर्यादा 2 लाख रुपयांवरुन 4 लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 'बुलेट' परतफेड योजनेतर्गंत, कर्जदार मूळ रक्कम आणि व्याज परत करु शकतो.'

याला ‘बुलेट’ परतफेड योजना का म्हणतात?

तथापि, गोल्ड लोनवरील व्याजाची संपूर्ण कालावधीसाठी दरमहा गणना केली जाते. पण मूळ रक्कम आणि व्याज एकदाच भरावे लागेल. म्हणूनच याला ‘बुलेट’ परतफेड असे म्हणतात.

दास पुढे म्हणाले की, 'हा उपाय आमच्या मागील घोषणेशी सुसंगत आहे की 31 मार्च 2023 पर्यंत प्राधान्य क्षेत्रातील कर्ज देण्याचे लक्ष्य पूर्ण करणाऱ्या UCB ला योग्य प्रोत्साहन दिले जाईल.'

आरबीआयने या वर्षी जूनमध्ये चलनविषयक धोरणाच्या आढाव्यात सांगितले होते की, मार्च 2023 पर्यंत प्राथमिक क्षेत्रासाठी निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या नागरी सहकारी बँकांना योग्य प्रोत्साहन दिले जाईल.

RBI ने शुक्रवारी सलग चौथ्यांदा पॉलिसी रेट रेपो रेट 6.5 टक्के ठेवला. याचा अर्थ होम, वाहनासह विविध कर्जावरील (Loan) मासिक ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

SCROLL FOR NEXT