RBI Dainik Gomantak
अर्थविश्व

RBI on Unsecured Lending: आरबीआयने बदलले नियम, पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड लोन मिळणे होणार कठीण

RBI on Unsecured Lending: जर तुम्ही आगामी काळात वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट घेण्याचा विचार करत असाल तर हे काम थोडे कठीण होऊ शकते.

Manish Jadhav

RBI on Unsecured Lending: जर तुम्ही आगामी काळात वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट घेण्याचा विचार करत असाल तर हे काम थोडे कठीण होऊ शकते.

होय, सूत्रांचा दावा आहे की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना अनसिक्योर्ड रिटेल लोन आणि क्रेडिट कार्ड जारी करण्यापूर्वी ग्राहकांचे बॅकग्राउंड चेक करण्याचे काम अधिक कडक करण्यास सांगितले आहे. असुरक्षित कर्जामध्ये, बँकांकडे काहीही तारण ठेवले जात नाही. यामुळेच त्यांचा व्याजदर इतर कर्जांपेक्षा जास्त आहे.

क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक कर्जाचा कल झपाट्याने वाढला

दरम्यान, अशी कर्जे बुडण्याचा वाढता धोका पाहता आरबीआयने बँकांना इशारा दिला आहे. रिझर्व्ह बँक डिफॉल्टच्या वाढत्या जोखमीच्या दरम्यान असुरक्षित पोर्टफोलिओवर अंकुश ठेवू शकते.

कोरोना महामारीनंतर (Corona Epidemic) क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक कर्जाचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. आकडेवारीनुसार, 2022 मध्ये वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांची संख्या 7.8 कोटींवरुन 9.9 कोटी झाली आहे.

त्याचप्रमाणे क्रेडिट कार्डवरुन कर्ज घेणाऱ्यांची संख्याही 28 टक्क्यांनी वाढून 1.7 लाख कोटींवर पोहोचली आहे. आधी ते 1.3 लाख कोटी होते.

वैयक्तिक कर्ज 40 लाख कोटींपर्यंत वाढले

दुसरीकडे, 2023 मध्ये देखील असुरक्षित कर्जाचा वेग झपाट्याने वाढत आहे. आरबीआयने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2022 च्या तुलनेत, वैयक्तिक कर्ज फेब्रुवारी 2023 मध्ये 33 लाख कोटींवरुन 40 लाख कोटीपर्यंत वाढले आहे. म्हणजेच त्यात 20.4% ची वाढ दिसून आली.

महागाई (Inflation) आणि वाढत्या व्याजदरांमध्ये असुरक्षित पत वाढ ही चिंतेची बाब असल्याचे आरबीआयचे मत आहे. यामुळेच रिझव्‍‌र्ह बँकेने संभाव्य थकबाकीची शक्यता लक्षात घेऊन असुरक्षित कर्जांवर कठोर होण्यास सांगितले आहे.

याशिवाय, बँकांच्या बाजूने काही बदल करण्यात आले आहेत. सूत्रांचे म्हणणे आहे की, आरबीआय असुरक्षित कर्जामध्ये रिस्क वेट वाढवू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Flood Crisis: आधी पाण्यासाठी तडफडला, आता महापुराची भीती! निसर्गाच्या दुहेरी चक्रव्यूहात अडकला पाकिस्तान; भारताकडून कोणताही डेटा मिळेना

King Cobra Viral Video: 'स्टंट' पडला महागात! किंग कोब्राला किस करण्यासाठी झुकला अन् क्षणार्धात जीवघेणा हल्ला; व्हिडिओ पाहून अंगावर काटा

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी! रिपोर्ट कधी जाहीर होणार आणि पगारात किती वाढ होणार? जाणून घ्या सर्व काही

'वो दबाव नहीं, सम्मान का हकदार है...', रोहितच्या निवृत्तीच्या वृत्ताने माजी क्रिकेटपटू संतापला; गंभीर-अजित टार्गेटवर

Guru Gochar 2026: नक्षत्रांचा राजा आणि देवगुरुंची युती! 'या' 5 राशींच्या आयुष्यात सुरु होणार सोन्यासारखा काळ; व्यवसायात नव्या आयडिया ठरतील सुपरहीट

SCROLL FOR NEXT