Ration Card Holders Dainik Gomantak
अर्थविश्व

Ration Card Update: सरकारी दुकानातून राशन घेण्याच्या नियमात मोठा बदल! जाणून घ्या

Department of Food & Public Distribution: शिधापत्रिकेच्या लाभार्थ्यांसाठी कामाची बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

Standards For Ration Card: शिधापत्रिकेच्या लाभार्थ्यांसाठी कामाची बातमी आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग शिधापत्रिकेच्या नियमात बदल करत आहे. वास्तविक, शासकीय राशन दुकानातून राशन घेणार्‍या पात्र लोकांच्या मानकांमध्ये विभाग बदल करत असून नवीन मानकाचा मसुदा आता जवळपास तयार झाल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात राज्य सरकारांसोबत अनेक बैठकाही झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. जाणून घेऊया नवीन तरतुदीत काय होणार?

अपात्रही लाभ घेत आहेत

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या मते, सध्या देशभरात 80 कोटी लोक राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचा (NFSA) लाभ घेत आहेत. त्यांच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेले अनेक लोक आहेत. हे लक्षात घेऊन सार्वजनिक वितरण मंत्रालय मानकांमध्ये बदल करणार आहे. वास्तविक, आता नवीन मानक पूर्णपणे पारदर्शक केले जाईल, जेणेकरुन कोणताही गोंधळ उडणार नाही.

बदल का होत आहेत?

या संदर्भात अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने माहिती दिली की, 'राशनच्या मानकांमध्ये बदल करण्याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यांशी बैठक सुरु आहे. राज्यांनी दिलेल्या सूचनांचा समावेश करुन पात्र लाभार्थ्यांसाठी नवीन मानके तयार केली जात आहेत. ही मानके लवकरच निश्चित केली जातील. नवीन मानक लागू झाल्यानंतर केवळ पात्र व्यक्तींनाच लाभ मिळेल, अपात्र व्यक्तींना लाभ मिळू शकणार नाही. गरजूंना डोळ्यासमोर ठेवून हा बदल करण्यात येत आहे.

वन नेशन, वन राशन कार्ड योजना

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर 2020 पर्यंत 32 राज्ये (States) आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 'वन नेशन, वन रेशन कार्ड' (ONORC) योजना' लागू करण्यात आली आहे. सुमारे 69 कोटी लाभार्थी म्हणजेच NFSA अंतर्गत येणाऱ्या लोकसंख्येपैकी 86 टक्के लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. दर महिन्याला सुमारे 1.5 कोटी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन लाभ घेत आहेत. अशा परिस्थितीत सरकारला (Government) आता पात्रांना शक्य ती सर्व मदत करायची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोडलेला हात आणि पाय, लंगडी घालत आला पोलिस स्थानकात; ऑस्ट्रेलियन खेळाडुंची छेड काढणाऱ्या संशयिताला अटक Watch Video

Satish Shah: सलग 55 एपिसोडमध्ये साकारल्या 55 भूमिका, सतीश शाहांचे निधन; हसऱ्या चेहऱ्याचा पडला पडदा

गोव्यात प्रथमच पार पडली वजन-माप खात्याच्या नियंत्रकांची राष्ट्रीय परिषद; CM सावंतांनी दिली ग्राहकांच्या हक्काचे जतन करण्याची हमी

हाताशी आलेली भातशेती आडवी, पणजीत घराचे नुकसान; गोव्यात मान्सूनोत्तर पावसाचे धुमशान

आमदार दिलायला लोबोंचा भिंत बांधकामावर प्रत्युत्तर; आरोपांना दिले राजकीय हेतूचे वळण

SCROLL FOR NEXT