Ration Shop Dainik Gomantak
अर्थविश्व

Ration Cardholder: राशनकार्डधारकांना दिवाळी भेट, सरकारने केली मोठी घोषणा

Free Ration Scheme: शिधापत्रिकाधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

Ration Card Update: शिधापत्रिकाधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही देखील शिधापत्रिकाधारक असाल, तर तुमची दिवाळी (Diwali 2022) यावेळी छान जाईल. अगदी अलीकडे केंद्र सरकारने मोफत राशन योजनेला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यानंतर राज्य सरकारे कार्डधारकांसाठी घोषणाही करत आहेत. याच क्रमाने आता सरकारने साखरेचे दर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर तुम्हाला 100 रुपयांत किराणा सामान मिळेल. नवीन अपडेट्स जाणून घेऊया.

आता साखरेसाठी एवढे पैसे मोजावे लागतील

वाढत्या महागाईच्या (Inflation) पार्श्वभूमीवर सरकारने साखरेचे दर कमी करण्याची घोषणा केली आहे. यानंतर तुम्हाला साखरेसाठी फक्त 20 रुपये प्रतिकिलो मोजावे लागतील. सरकारच्या या घोषणेचा लाभ अंत्योदय कार्डधारकांना मिळणार आहे. दुसरीकडे, सरकारच्या (Government) या घोषणेने कार्डधारकांना वाढत्या महागाईपासून दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र सरकारने जाहीर केले

केंद्र सरकारच्या (Central Government) घोषणांसोबतच राज्य सरकारही दिवाळी भेटवस्तू देत आहेत. दिवाळीनिमित्त महाराष्ट्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी विशेष घोषणा केली आहे. या अंतर्गत सरकार तुम्हाला फक्त 100 रुपयांत किराणा सामान देत आहे. केंद्र सरकारच्या मोफत राशन योजनेला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने देशभरातील कार्डधारकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर महाराष्ट्र सरकारच्या या घोषणेने राज्यातील शिधापत्रिकाधारकांची दिवाळी आणखीनच उजळून निघाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT