Ration Card Holders Dainik Gomantak
अर्थविश्व

Ration Card New Rule: मोठी बातमी, रेशनकार्डबाबत नवा नियम जारी; सरकारने दिली माहिती!

Manish Jadhav

Ration Card New Rule: रेशनकार्डधारकांसाठी एक मोठी बातमी आहे. तुमच्याकडेही रेशनकार्ड असेल तर सरकारने नियमांमध्ये मोठा बदल केला आहे.

सरकारकडून काही अटींनुसार नियम बदलले जात आहेत, परंतु जर तुम्ही या नियमांकडे दुर्लक्ष केले तर अडचणीत येऊ शकता. यासोबतच शासनाने वसुलीसाठीही तरतूद केली आहे. आता नवीन रेशन नियम काय आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत-

2023 मध्ये मोफत रेशन मिळत आहे

कोरोना काळात सरकारने (Government) देशातील जनतेसाठी मोफत रेशनची सुविधा सुरु केली होती, तेव्हापासून देशातील करोडो लोकांना मोफत रेशनचा लाभ मिळत आहे. सरकारने जाहीर केले आहे की, या संपूर्ण वर्षात म्हणजेच 2023 मध्ये तुम्हाला मोफत रेशन सुविधेचा लाभ मिळत राहील.

अपात्र लोक फायदा घेत आहेत

यावेळी शासनाच्या निदर्शनास आले आहे की, अनेक रेशनकार्डधारक पात्र नसून ते मोफत रेशनचा लाभ घेत आहेत. त्याचवेळी, योजनेच्या अनेक पात्र कार्डधारकांना त्याचा लाभ मिळत नाही.

चौकशीनंतर कायदेशीर कारवाई केली जाईल

अशा स्थितीत अपात्रांना तात्काळ रेशनकार्ड (Ration Card) जमा करण्यास अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात येत आहे. अपात्र व्यक्तीने रेशनकार्ड जमा न केल्यास त्याच्यावर चौकशीअंती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

काय आहे नवीन नियम?

जर कोणाकडे 100 चौरस मीटरचा भूखंड, फ्लॅट किंवा घर, चारचाकी किंवा ट्रॅक्टर, गावात दोन लाखांपेक्षा जास्त आणि शहरात तीन लाखांपेक्षा जास्त कौटुंबिक उत्पन्न असेल तर अशा लोकांनी त्यांचे रेशनकार्ड तहसील आणि डीएसओकडे जमा करावे.

हे लोक सरकारी राशनसाठी अपात्र आहेत

मोटार कार, ट्रॅक्टर, एसी, हार्वेस्टर, 5 केव्ही किंवा त्याहून अधिक क्षमतेचा जनरेटर, 100 चौरस मीटरचा भूखंड किंवा घर, पाच एकरपेक्षा जास्त जमीन, एकापेक्षा जास्त शस्त्र परवाना, ग्रामीण भागात आयकर भरणारा, कुटुंबाचे उत्पन्न 2 लाख वार्षिक 3 लाख आणि शहरी भागातील कुटुंबे या योजनेसाठी अपात्र आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: हणजूण येथे कंस्ट्रक्शन साइटवरुन पडून पश्चिम बंगालच्या मजूराचा जागीच मृत्यू!

Goa Vacation: बस, ट्रेन, विमान! सुट्टीत पुणे, मुंबईतून गोव्याला जाण्यासाठी कोणता पर्याय चांगला, किती रुपये मोजावे लागतील?

Borim News: गोव्यासाठी गुड न्यूज! बोरी पुलासाठी भारत सरकारकडून अधिसूचना जारी; लवकरच होणार पायाभरणी

Goa Dengue Cases: मडगावात डेंग्यूचे तुरळक प्रमाणात रुग्ण! तातडीने उपाययोजना केल्याचा परिणाम

Harvalem Panchayat: कोण बाजी मारणार? हरवळे पंचायत निवडणूकीवर सर्वांचे लक्ष

SCROLL FOR NEXT