Ration Card Holders Dainik Gomantak
अर्थविश्व

Ration Card: राशनकार्डधारकांची चांदी, सरकारने दिले दिवाळी गिफ्ट; बजेट जाहीर

Ration Card Latest News: दिवाळीनिमित्त सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी विशेष योजना आखली आहे.

दैनिक गोमन्तक

Ration Card Update: दिवाळीनिमित्त सरकारने राशनकार्डधारकांसाठी विशेष योजना आखली आहे. तुम्हीही राशनकार्डधारक असाल तर तुम्हाला मोठा फायदा मिळणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून गरीब आणि राशनकार्डधारकांना मोफत राशनसह अनेक विशेष सुविधा दिल्या जातात.

100 रुपयांमध्ये अनेक सुविधा मिळतील

यावेळी महाराष्ट्र सरकारने दिवाळीनिमित्त 513 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकार राज्यातील दीड कोटी राशनकार्डधारकांना दिवाळी भेट देणार आहे. याअंतर्गत राशनकार्डधारकांना केवळ 100 रुपयांमध्ये अनेक प्रकारचे लाभ मिळणार आहेत.

तुम्हाला कोणत्या वस्तू मिळतील?

मंत्रिमंडळाने (Cabinet) मंगळवारी आगामी दिवाळी सणासाठी राज्यातील राशनकार्डधारकांना 100 रुपयांत किराणा सामान देण्याचा निर्णय घेतला आहे. या 100 रुपयांच्या पाकिटात एक किलो रवा, शेंगदाणे, खाद्यतेल आणि मसूर असेल.

ऑफर 30 दिवस चालेल

राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुम्ही 30 दिवसांसाठी या ऑफरचा लाभ घेऊ शकता. साखर, हरभरा डाळ, खाद्यतेल आणि रवा सरकार (Government) 478 कोटी रुपयांना खरेदी करणार आहे. याशिवाय राशनकार्डधारकांसाठी 35 कोटींमध्ये इतर खाद्यपदार्थ खरेदी करण्यात येणार आहेत.

कोणत्याही दिवशी लाभ घेऊ शकतो

महाराष्ट्रात राहणारे राशनकार्डधारक 30 पैकी कोणत्याही एका दिवशी या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. अंत्योदय अन्न योजनेंतर्गत कार्डधारकांना राशनचा लाभ मिळवून देण्यास शासनाचे प्राधान्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT