Ratan Tata Dainik Gomantak
अर्थविश्व

आनंद महिंद्रांना मागे टाकत रतन टाटांच्या नावावर आणखी एक मोठा रेकॉर्ड, जाणून घ्या

Manish Jadhav

Rata Tata on Social Media: रतन टाटा यांना आपण सर्वजण ओळखतो... त्यांच्या औदार्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. बिझनेसमन असण्यासोबतच ते सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात.

आता त्यांच्या नावावर एक मोठा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. आता X वर रतन टाटा यांनी महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनाही मागे सोडले आहे. रतन टाटांनी आता कोणती कामगिरी केली ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत

हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 मधून मिळालेल्या माहितीनुसार, रतन टाटा (Ratan Tata) यांनी सोशल मीडियावर फॉलोअर्सच्या बाबतीत सर्वांना मागे टाकले आहे. भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रात, उद्योगपती रतन टाटा यांचे X (पूर्वीचे ट्विटर) वर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. यापूर्वी, हा रेकॉर्ड आनंद महिंद्रा यांच्या नावावर होता.

12.6 दशलक्ष फॉलोअर्स

हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 नुसार, लोक सोशल मीडियावर रतन टाटा यांना सर्वाधिक फॉलो करतात. फॉलोअर्सच्या यादीत ते खूप पुढे गेले आहेत. रतन टाटांचे फॉलोअर्स 12.6 दशलक्ष झाले आहेत.

एका वर्षात 8 लाख फॉलोअर्स वाढले

रतन टाटा यांच्या फॉलोअर्समध्ये गेल्या वर्षभरात लक्षणीय वाढ झाली आहे. एका वर्षात रतन टाटा यांच्या फॉलोअर्समध्ये सुमारे 8 लाखांनी वाढ झाली आहे. या वाढीनंतरच ते आनंद महिंद्राच्या पुढे गेले आहेत.

या यादीत आनंद महिंद्रा दुसऱ्या क्रमांकावर आहे

याशिवाय, आनंद महिंद्राबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांचे सध्या X वर 10.8 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. आनंद महिंद्रा (Anand Mahindra) देखील ट्विटरवर खूप सक्रिय आहेत. 360 वन वेल्थ हुरुन इंडिया लिस्टनुसार, आनंद महिंद्रा सोशल मीडियावर फॉलोअर्सच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आनंद महिंद्रा यांनाही 1 कोटीहून अधिक लोक फॉलो करतात.

मोटीव्हेशन पोस्ट

आनंद महिंद्रा यांची मोटीव्हेशन पोस्ट विशेष पसंद केली जाते. यासोबतच आनंद महिंद्रा रोज काही ना काही पोस्ट करत असतात, जी मोठ्याप्रमाणात व्हायरल होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT