Rakesh Jhunjhunwala and Radhakishan Damani will buy stakes in RBL Bank

 

Dainik Gomantak

अर्थविश्व

राकेश झुनझुनवाला आणि राधाकिशन दमानी RBL बँकेतील भागभांडवल खरेदी करणार

RBI सध्या झुनझुनवाला आणि दमानी यांच्या विनंतीवर विचार करत आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunhunwala) आणि डी-मार्टचे (D-Mart) संस्थापक राधाकिशन दमाणी (RK Damani) यांनी आर्थिक संकाटाचा सामना करत असलेली खासगी बँक((RBL Bank))मध्ये 10 टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी RBI कडे अर्ज केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार झुनझुनवाला आणि दमानी यांनी ही विनंती केंद्रीय बँकेच्या कारवाईपूर्वी केली होती.

RBI सध्या झुनझुनवाला आणि दमानी यांच्या विनंतीवर विचार करत आहे. सेंट्रल बँकेने ख्रिसमसच्या दिवशी मुंबईतील 78 वर्षीय बँक आरबीएलमध्ये दोन मोठे बदल केले आहेत. RBI चे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांना खाजगी बँकेच्या संचालक मंडळावर अतिरिक्त संचालक म्हणून नियु्क्त करण्यात आले आहे तर बँकेचे दीर्घकाळ एमडी आणि CEO विश्ववीर आहुजा यांना तात्काळ रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागी कार्यकारी संचालक राजीव आहुजा यांना एमडी आणि सीईओ बनवण्यात आले आहे.

राजीव आहुजा यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीबद्दलची शंका दूर करण्याच्या प्रयत्नात रविवारी सांगितले की, डिसेंबर तिमाहीत बँकेचा नफा सप्टेंबरच्या तिमाहीपेक्षा जास्त असेल. बोर्डाने विश्ववीर आहुजा यांची रजेवर गेल्यानंतर जबाबदारीसाठी निवड केली आहे आणि आरबीआयने नियुक्त केलेल्या अतिरिक्त संचालकाने देखील त्यांना पाठिंबा दिला आहे. आरबीएल बँक आणि तिच्या धोरणाला मध्यवर्ती बँकेचा पूर्ण पाठिंबा आहे, असे राजीव आहूजा म्हणाले.

विश्ववीर आहुजाच्या आकस्मिक जाण्याबाबत राजीव आहुजा यांनी आपले मत व्यक्त केले, "वैद्यकीय कारणामुळे त्यांनी पद सोडले आहे. मात्र, त्यांनी अधिक माहिती दिली नाही. विश्ववीर यांचा कार्यकाळ अवघा सहा महिने शिल्लक होता," असे ते यावेळी म्हणाले.

मायक्रो फायनान्स कर्ज देण्यावर अधिक भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली,' आम्हाला सेवा, प्रशासन हवे आहे, डिजिटल आणि जोखमीच्या क्षेत्रात अधिक लक्ष द्यावे लागेल. बँकेकडे 15,000 कोटी रुपयांहून अधिक तरलता आहे आणि ती ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी पावले उचलत आहे. मार्च 2022 पर्यंत बँक आपला निव्वळ एनपीए 2 टक्क्यांच्या खाली आणेल असे राजीव आहुजा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT