Money Dainik Gomantak
अर्थविश्व

6 रुपयांपेक्षा कमी असलेल्या या शेअरने केली कमाल, जाणून घ्या

पेनी स्टॉकमध्ये (Penny stock) गुंतवणूक करणे नेहमीच जोखमीने भरलेले असते.

दैनिक गोमन्तक

पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे नेहमीच जोखमीने भरलेले असते. परंतु जर तुम्ही योग्य माहिती गोळा केली आणि पेनी स्टॉकवर बेट लावले, तर परतावा मिळण्याची शक्यता लक्षणीय वाढते. जेव्हा आपण एखाद्या कंपनीचा डेटा एक्सप्लोर करायला जातो तेव्हा त्या कंपनीचे बिझनेस मॉडेल काय आहे आणि ते दीर्घकालीन किती प्रभावी ठरेल हे तपासले पाहिजे. असाच एक पेनी स्टॉक आहे रजनीश वेलनेस लिमिटेड, ज्याने केवळ एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. (rajnish wellness limited gives stellar return 1 lakh rupees become 33 lakh rupees)

दरम्यान, रजनीश वेलनेस लिमिटेडच्या शेअरची किंमत एका वर्षात 5.56 रुपयांवरुन 185 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत कंपनीच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना (Investors) 3200% परतावा दिला आहे.

कंपनीच्या स्टॉकचा इतिहास काय आहे

BSE मध्ये 203 रुपयाची सर्वकालीन उच्च पातळी गाठल्यानंतर कंपनीच्या शेअरच्या किमतीत घसरण झाली आहे. त्याचवेळी, या वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीच्या शेअरची किंमत 20.45 रुपयांच्या पातळीवरुन 185 रुपयांच्या पातळीवर पोहोचली आहे. गेल्या 6 महिन्यांबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीच्या शेअरची (Share) किंमत 46 रुपयांवरुन 185 रुपयांच्या पातळीवर आली आहे. त्याचप्रमाणे गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरची किंमत 5.56 रुपयांवरुन 185 रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच, या कालावधीत 3200% ची उडी दिसून आली आहे.

गुंतवणुकीवर काय परिणाम झाला

जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिन्याभरापूर्वी या कंपनीच्या शेअरवर सट्टा लावला असता तर आज तो 98000 पर्यंत खाली आला आहे. त्याच वेळी, या वर्षाच्या सुरुवातीला ज्याने या कंपनीच्या स्टॉकवर विश्वास ठेवला होता, तो आज 9 लाख रुपयांपर्यंत वाढला असेल. त्याचप्रमाणे, ज्याने वर्षभरापूर्वी जोखीम पत्करून 1 लाख रुपये गुंतवले, त्याला आज 33 लाख रुपयांचा परतावा मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

SCROLL FOR NEXT