देशात रेल्वेने प्रवास करणे आता अधिक सुरक्षित होणार आहे. भारतीय रेल्वेचा पूर्व मध्य रेल्वे (ECR) झोन त्याच्या झोनमधून जाणाऱ्या अनेक गाड्या सुरळीत चालवण्यासाठी 'कवच' नावाची अॅडवांस सिग्नलिंग प्रणाली स्थापित करेल. आत्मनिर्भर भारत (Atmanirbhar Bharat) अंतर्गत, 2022-23 मध्ये सुरक्षेसाठी स्वदेशी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान कवच (kavach Technology) अंतर्गत 2,000 किमीचे नेटवर्क आणले जाईल. रेल्वेचे जाळे सुरक्षित करण्यासोबतच त्याची क्षमता वाढवण्याचे कामही हे तंत्रज्ञान करणार आहे. कवच हे तंत्र देशातच विकसित झाले असून ते स्वदेशी तंत्र आहे.(Indian Railway 'Kavach')
ईसीआरचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) वीरेंद्र कुमार यांनी सांगितले की, ही प्रणाली पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन-गया (Gaya)- धनबाद (Dhanbad) ग्रँड कॉर्ड मार्गावर स्थापित केली जाईल आणि त्यासाठी अंदाजे खर्चासाठी रु.151 करोड़ रुपये आहे, त्याची निविदा सुध्दा काढण्यात आली आहे.
कुमार यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, 408 किमी लांबीचा पं दीनदयाल उपाध्याय जंक्शन-गया-धनबाद ग्रँड कॉर्ड मार्ग हा आपल्या देशातील 77 स्थानके आणि 79 लेव्हल क्रॉसिंग गेट्स समाविष्ट करणारा एक महत्त्वाचा आणि व्यस्त रेल्वे मार्ग आहे. या मार्गावर ताशी 130 किमी वेगाने गाड्या चालवण्यास विभागाने परवानगी दिली आहे.
कवच सिस्टम म्हणजे काय?
या प्रणालीचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की, कवच हे टक्करविरोधी तंत्रज्ञान आहे जे आपल्याला रेल्वे (Railway) ट्रॅकवर शून्य अपघात होण्यास मदत करेल. ही प्रणाली मायक्रो प्रोसेसिंग, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम आणि रेडिओ कम्युनिकेशनवर काम करते. हे उपकरण संपूर्ण मार्गावर असलेल्या स्थानकांशी थेट रेडिओ प्रणालीद्वारे जोडणाऱ्या लोकोमोटिव्हच्या केबिनमध्ये स्थापित केले जाणार आहे. स्टँडर्ड्स रिसर्च ऑर्गनायझेशनने ही प्रणाली डिझाइन आणि विकसित केली आहे. डिव्हाइसमध्ये अंगभूत ऑटोमॅटिक ब्रेक सिस्टीम आहे जी सेन्सर्सद्वारे पुढच्या किंवा मागील प्रवासी ट्रेनच्या टक्कर संभाव्यतेची तपासणी करेल.
काम कसे करणार
ट्रेनची टक्कर टाळण्यासाठी, भारतीय रेल्वेने TCAS (ट्रेन कोलिजन अवॉयडन्स सिस्टीम) नावाची पूर्णपणे स्वदेशी प्रणाली विकसित केली आहे. लाल दिवा सिग्नल, वेग आणि टक्कर रोखण्यासाठी TCAS भारतीय रेल्वेवर विकसित केले गेले आहे. आणि त्याला 'कवच' आसे नाव देण्यात आले आहे.
टीसीएएस मूव्हमेंट ऑथॉरिटीचे सतत अपडेट देते. त्यामुळे, असुरक्षित परिस्थितीत जेव्हा ब्रेक लावणे आवश्यक असते आणि क्रू एकतर तसे करण्यात अयशस्वी होतो किंवा तसे करण्याच्या स्थितीत नसतो तेव्हा स्वयंचलित ब्रेक लागू केले जाऊ शकतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.