Raghuram Rajan Dainik Gomantak
अर्थविश्व

व्याजदर वाढवणे ही ‘देशविरोधी’ कृती नाही – रघुराम राजन

राजकारणी आणि नोकरदारांनी समजून घेण्याचे केले आवाहन

दैनिक गोमन्तक

भारतात कोणत्या ही पक्षाचे सरकार असले तरी कोणत्या ही प्रकारची तडजोडीची भूमिका न घेता आपली ठामपणे मांडणारे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि सध्या शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेस विद्यापीठात प्राध्यापक म्हणून आपल्या आवडीच्या क्षेत्रात कार्यरत असलेले रघुराम राजन यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका ठामपणे मांडत बँकांची बँक अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करत त्याची कारणे काय आहेत. हे देखील स्पष्ट केले आहे. (Raising interest rates is not an 'anti-national' act - Raghuram Rajan )

राजन यांनी म्हटले आहे कि, महागाई नियंत्रणात आणण्यासाठी मध्यवर्ती बँकेला व्याजदर दर वाढवावे लागतील आणि या दरवाढीकडे राजकारणी आणि नोकरदारांनी “देशविरोधी” पाऊल म्हणून पाहू नये. आपल्या परखड मतांसाठी ओळखल्या जाणाऱ्या राजन यांच्या मते, ‘महागाई विरोधातील लढाई’ कधीच संपत नाही, हे लक्षात ठेवायला हवे. असे ही ते म्हणाले आहेत.

‘लिंक्ड इन’ या सोशल नेटवर्किंग साइटवर याबद्दल त्यांनी लिहिले आहे की, “भारतात महागाई वाढत आहे. काही क्षणी आरबीआयला जगातील इतर देशांप्रमाणे व्याजदर वाढवावे लागतील.” अन्नधान्याच्या किंमतीत तीव्र वाढ झाल्यामुळे मार्चमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर १७ महिन्यांच्या उच्चांकी ६.९५ टक्क्यांवर पोहोचला.

तसेच “राजकारणी आणि नोकरदारांनी हे समजून घेतले पाहिजे की दर वाढ करणे ही देशविरोधी कृती नाही, ज्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना फायदा होईल. त्याऐवजी, आर्थिक स्थैर्यासाठी उचललेले हे पाऊल आहे, ज्याचा देशाला सर्वाधिक फायदा होतो.” असेही राजन यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT